इंदापूर, ता. २८ : सरडेवाडी येथील ‘मे. देवकृपा अग्रो’मध्ये वीजमीटरमध्ये फेरफार करून १८ लाख ३८ हजार ९४८ रुपयांची वीजचोरी केल्याचा प्रकार महावितरणच्या पुणे शहर भरारी पथकाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी कारखान्याचे केअरटेकर विक्रम जोतिराम जाधव व सचिन नलवडे यांच्याविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्या जाधव व त्यांच्या पथकाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सरडेवाडी येथील गट नं. ७१/२ मधील ‘मे. देवकृपा अग्रो’ येथे तपासणी केली. या वेळी मीटरच्या फेजेचे स्क्रू लूज करून आणि आर (R) फेजेच्या टर्मीनलमध्ये अनधिकृतपणे स्क्रू ड्रायव्हर घालून मीटर बंद पाडले जात असल्याचे आढळले. मीटर बंद असतानाही कारखान्यातील मशिनरी मात्र सुरू होत्या. या पद्धतीने गेल्या १३ महिन्यांत ८४ हजार १८१ युनिट्सची चोरी करून महावितरणचे १८ लाख ३८ हजार ९४८ रुपयांचे नुकसान करण्यात आले. तपासणीत ४३.१६६ किलोवॉट जोडभार आढळला असून, ६ लाख ७० हजार रुपयांची तडजोड रक्कम निश्चित केली होती. मात्र, चोरीचे बिल व तडजोड रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याने अखेर पथकाने फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचा व्हिडिओ व इतर पुराव्यासह मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.