पुणे

पुणेकर दारूसाठी अपॉइंटमेंट घेण्यातही आघाडीवर

सकाळवृत्तसेवा

पुणे - मद्य (दारू) खरेदी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ई-टोकन प्रणाली सुरू केल्यावर मंगळवारी पहिल्याच दिवशी 10 हजार 877 पुणेकरांनी घरात बसून मद्य खरेदीसाठी नोंदणी करून डिलिव्हरी घेतली. 

नागरिकांना घरात बसून दुकानदाराची अपॉइंटमेंट घेऊन त्यानुसार मद्य खरेदी करता येणार आहे. mahaexcise.com या संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर ग्राहकाला ई-टोकन मिळेल. त्यामुळे उन्हात रांगेत उभे राहून मद्य खरेदीच्या त्रासापासून ग्राहकांची सुटका होणार आहे. या वेबसाइटचे संचलन सुरळीतपणे सुरू राहील, यासाठी संबंधितांना सूचना दिल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली. 

राज्य सरकारने 5 मे पासून मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. त्यासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास महापालिका आणि पोलिसांनी परवानगी दिली. मात्र, अनेक ठिकाणी रांगा लागत असल्यामुळे टोकन पद्धतीने मद्यविक्रीची सूचना उत्पादन शुल्क विभागाने केली. टोकन पद्धत रूळेपर्यंत ग्राहकांना नेहमीच्या पद्धतीनेही मद्यविक्री होणार आहे, असेही झगडे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे खरेदी करा मद्य 
- ई-टोकनसाठी mahaexcise.com या संकेतस्थळावर नोंदणी करा. 
- त्यात नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, मद्याचा प्रकार लिहा. 
- पत्त्यातील पिनकोडनुसार दुकानांची यादी डिस्प्ले होईल. 
- त्यानुसार ग्राहकाने जवळचे दुकान निश्‍चित करावे. 
- त्यावर क्‍लिक केल्यानंतर अर्ध्या तासांचे स्लॉटस निश्‍चित होतील. 
- ग्राहकाने स्लॉट निश्‍चित केल्यानंतर डिजिटल ई- टोकन तयार होईल. 
- त्यानंतर ग्राहकाने त्या दुकानात जाऊन ई-टोकन दाखवून मद्य घ्यावे. 

पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये 179 दुकानांत हा प्रयोग सुरू झाला आहे. पुण्यात यशस्वी झाला तर राज्यात त्याची अंमलबजावणी करण्याचा उत्पादन शुल्क विभागाचा मानस आहे. 
- संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT