Elgar Parishad case to appoint their own electronic expert for verification of e-evidence 
पुणे

पुराव्यांच्या तपासणीसाठी संशयितांनी तज्ज्ञ नेमावा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील संशयितांना पोलिसांकडून दिलेल्या पुराव्यांच्या तपासणीसाठी आरोपींनी स्वतःचा इलेक्‍ट्रॉनिक तज्ज्ञ नेमावा. संबंधित तज्ज्ञाने क्‍लोन कॉपीबाबत सर्व तपासणी करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना बुधवारी (ता. 18) न्यायालयाने दिल्या आहेत. 

पोलिसांनी तपासादरम्यान 25 टेरा बाइट डाटा जप्त केला. मात्र, क्‍लोन कॉपीकरून आम्हाला केवळ दहा टेरा बाइट डाटा देण्यात आला आहे. जोपर्यंत पूर्ण डाटा आणि कागदपत्रे देण्यात येणार नाहीत. तोपर्यंत दोषारोपांची मांडणी (चार्ज फ्रेम) करू नये, असा युक्तिवाद ऍड. सुरेंद्र गडलिंग यांनी केला. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे. 

अटक केलेल्या नऊ संशयितांविरोधात आज चार्ज फ्रेम करण्यात येणार होते. त्यास ऍड. गडलिंग यांनी विरोध केला. या प्रकरणातील संशयित सुधीर ढवळे, ऍड. गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन, व्हर्णन गोन्सालविस, अरुण फरेरा आणि वरवरा राव यांचा जामीन अर्ज न्यायालयाने नुकताच फेटाळला. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडून आम्हाला दोन हार्ड डिस्क देण्यात आल्या. त्यात दहा टेरा बाइटच डाटा आहे, असे ऍड. गडलिंग यांनी न्यायालयास सांगितले. पोलिसांनी चार्ज फ्रेमचा आराखडा न्यायालयात दाखल केला आहे. तो पुढील तारखेला मंजूर होण्याची शक्‍यता आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी एक जानेवारीला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं-चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

April 2026 Calendar: हनुमान जयंती, अक्षय तृतीया ते सीता नवमी; आंब्याच्या मोसमातील खास सण आणि महत्त्वाचे दिवस जाणून घ्या

सोनम कपूरच्या घरी आला गोड पाहुणा, अभिनेत्री झाली आई, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Satara ZP Controversy : मोठी बातमी! सातारा SP तुषार दोषींना 'सक्तीची रजा'; मंत्री शंभूराज देसाईंच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारची कारवाई

SCROLL FOR NEXT