पुणे

मशागत ः फारूक काझी

CD

मशागत ः फारूक काझी

अजून, थोडे सोस मना
---------------------
आयुष्याच्या वाटेवर चालताना कधी फुलांचा सडा भेटतो, तर कधी काट्यांनी भरलेली वाट. सुखाचे क्षण आपण आनंदाने स्वीकारतो; पण दुःख, अपयश आणि संघर्ष समोर आले की मन अस्वस्थ होते. अशा वेळी बा. सी. मर्ढेकरांची ‘अजून, थोडे सोस मना’ ही कविता मनाला थांबवते आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवते.
कवी म्हणतात,
‘रे, अजून थोडे सोस मना’
हा केवळ मनाला दिलेला दिलासा नाही, तर जीवनाचे वास्तव स्वीकारण्याची तयारी आहे. जगताना प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेलच असे नाही. काही इच्छा अपुऱ्या राहतील, काही स्वप्ने तुटतील, काही माणसं दूर जातील. तरीही जीवन थांबत नाही.
कवी पुढे अतिशय सुंदर प्रतिमा वापरतात-
‘जळल्यावाचून नाही ज्योती,
कढल्यावाचून नाही मोती.
नच घणांवाचुनी देवपणा’

ज्योत निर्माण होण्यासाठी वात जळते आणि मोती तयार होण्यासाठी शिंपल्याला वेदना सहन कराव्या लागतात. घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपण येत नाही. निसर्गातील ही उदाहरणे माणसाच्या जीवनालाही लागू पडतात. संघर्षाशिवाय व्यक्तिमत्त्वाला धार येत नाही. अडचणींमधूनच अनुभव मिळतो आणि अनुभवातून माणूस अधिक समृद्ध होत जातो.
‘प्रसववेदनांविण ना सृष्टी
तपनावाचुनी नाही वृष्टी’
ही ओळ तर निर्मितीमागच्या वेदनेची जाणीव करून देते. एखादे सुंदर स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. एखाद्या विद्यार्थ्याला यश मिळविण्यासाठी अभ्यास, सराव आणि अपयशातून शिकण्याची तयारी ठेवावी लागते. एखाद्याला व्यापार उभा करायचा तर अनेक चढ उतार पाहावे लागतात. सतत संघर्ष करत राहावे लागते. कलाकार, खेळाडू, शास्त्रज्ञ किंवा लेखक कोणाचेही यश सहज मिळालेले नसते. अपार मेहनत आणि मेहनतीतील सातत्य यांच्या बळावर ते पुढे जात राहतात. कुणाचं तरी बोट धरून तुम्ही सुरुवात करू शकता; परंतु टिकून तर स्वत:च्या हिमतीवरच राहावे लागते. यशाला शॉर्टकट नसतो. त्याला मेहनतच लागते.
आजच्या झटपट यशाच्या काळात ही कविता अधिक महत्त्वाची वाटते. आपल्याला लगेच यश हवं आहे. प्रसिद्धी हवी आहे. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी आहे. पण सातत्याने मेहनत नको आहे. पैसा, प्रसिद्धी क्षणिक असते. मात्र घेतलेले कष्ट सोबत राहतात. आपण अनेकदा फक्त परिणाम पाहतो; पण त्या परिणामांमागचा संघर्ष पाहत नाही. दुसऱ्याचे यश दिसते, मात्र त्याने सोसलेले कष्ट, केलेले प्रयत्न आणि अनुभवलेले अपयश दिसत नाही.
सुखाची आस वाईट नाही पण मेहनतीची तयारी असेल तर सुख दरात उभं असेल. म्हणूनच मर्ढेकरांची ही कविता केवळ वाचून संपणारी कविता नाही. ती मनात एक प्रश्न निर्माण करते. आपल्याला फक्त सुखाने जगायचे आहे, की जीवनाच्या खडतर वाटेलाही समजून घ्यायचे आहे? कदाचित या प्रश्नाचे उत्तर शोधतच आपल्याला पुन्हा पुन्हा स्वतःला म्हणावे लागेल.
‘अजून, थोडे सोस मना...’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Supreme Court Hearing: ठाकरे गटाची याचिका, निवडणूक आयोगावर सवाल अन् धनुष्यबाणाचा पेच; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या

RTI Penalty Vasai-Virar: वसई-विरार महापालिकेला ५० हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश; RTI अर्जदाराला मानसिक-आर्थिक त्रास

Marathi poetry translation in Mexico: मराठी काव्यानुवादाचा मेक्सिकोत डंका; डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या अनुवादित कविता ‘अल्किमिया देव रेलाम्पागो’मधून प्रकाशित

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर

Viral Video : आजीचं स्वप्न नातीने केलं पूर्ण; पहिल्यांदाच विमानात बसवून नेलं गोव्याला, हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT