Corona-patient
Corona-patient 
पुणे

पुण्यात वाढतोय अत्यवस्थ रुग्णांचा आकडा; व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन आणि ‘आयसीयू’ बेडची कमतरता

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यात महापालिका आणि खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन आणि ‘आयसीयू’ बेडची कमतरता असतानाच अत्यवस्थ रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. ही संख्या पाचशेच्या पुढे गेल्याने मृत्युचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. कोरोनासह अन्य आजार असल्याने उपचारादरम्यान रुग्णांची प्रकृती बिघडत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दुसरीकडे मात्र, मृतांचा आकडा एक हजारापर्यंत जात असल्याचे दिसून येत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर होत आहे, अशांवर तातडीने आणि आवश्‍यक ते उपचार करीत आहोत. ज्यामुळे मृत्युचा धोका टाळता येत आहे, असे महापालिका प्रशासन सांगत आहे. त्याचवेळी अत्यवस्थ स्थिती म्हणजे, अगदी सलग तीन-चार दिवस व्हेंटिलेटरवर असलेले रुग्णही पूर्णपणे बरे झाले आहेत. गंभीर रुग्णांसाठी खबरदारी म्हणून पुरेशा प्रमाणात ऑक्‍सिजनची व्यवस्था करण्यात येत आहे, असे महापालिकेचे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

कोरोनाला रोखण्यासाठी रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार करताना महापालिकेने तपासणीची संख्या वाढविली आहे. ती आता रोज पावणेसहा हजारपर्यंत गेली आहे. त्यामुळे नवे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. ज्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत, त्याप्रमाणात गंभीर रुग्णही वाढले आहेत. उपचारव्यवस्था विस्तारली जात असली तरी, ऑक्‍सिजन आणि आयसीयू बेड मिळत नसल्याने रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत आहे.

५१९ - पुण्यातील अत्यवस्थ रुग्ण 
१९९ - व्हेंटिलेटरवरील रुग्ण

तपासणी वाढविल्याने रुग्ण आणि अत्यवस्थ रुग्णांचे आकडे मोठे दिसत आहेत. मात्र, अशा रुग्णांना तातडीने उपचार देत, त्या-त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ज्यामुळे अत्यावस्थ रुग्ण बरे होत असून, आयसीयू, ऑक्‍सिजनवरील ५० टक्के रुग्ण बरे होते आहेत. 
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख महापालिका

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT