चिंचवड. पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर पासेस घेण्यासाठी अत्त्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांनी केलेली गर्दी. 
पुणे

Coronavirus : अत्यावश्यक सेवा करणाऱ्यांसाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पासेस देण्यास सुरुवात

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असतानाही पोलीस तुम्हाला अडवत असतील, तर आता चिंता करू नका. अशा सेवेत काम करणाऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने संबंधितांना पासेस देण्यास सुरुवात झाली आहे.

आरोग्य सेवेत काम करणारे, धान्याची वाहतूक करणारे, कुटुंबातील एखाद्या आजारी व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाणारे अशासारख्यांना हे पासेस दिले जाणार आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे  यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत गृहमंत्रालयाचे निर्देश आणि उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी उपायुक्त दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांची 'इन्सिडेंट कमांडर' म्हणून  नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांकडे आवश्यक ती कागदपत्रे जमा केल्यानंतर तातडीने पासेसचे वाटप केले जात आहे. अशा पद्धतीने पास घेण्यासाठी चिंचवड स्टेशन येथील  पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर नागरिकांची रांग लागत आहे.  

आयुक्तालयासाठी उपायुक्त सुधीर हिरेमठ, परिमंडळ एकसाठी उपायुक्त स्मिता पाटील तर परिमंडळ दोनसाठी उपायुक्त विनायक ढाकणे यांची 'इन्सिडेंट कमांडर' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परिमंडळ एकमध्ये  पिंपरी, चिंचवड भोसरी, भोसरी एमआयडीसी, निगडी, दिघी, आळंदी या ठाण्यासह म्हाळुंगे पोलीस चौकीचा समावेश आहे. परिमंडळ दोनच्या हद्दीत  हिंजवडी, वाकड, सांगवी, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी  या पोलिस  ठाण्यासह  रावेत, शिरगाव पोलीस चौकीचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : जयंत पाटील-फडणवीस खलबतानंतर लगेच शरद पवारांची एन्ट्री; मुख्यमंत्र्यांशी चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Uruli Kanchan News : चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने चारचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू, तर दोन महिला जखमी

Maharashtra Live News : इम्पेरियल हाईट्समधील आगीवर ७ तासांनंतर नियंत्रण; २ महिलांचा होरपळून मृत्यू, कोट्यवधींचे नुकसान

Karad News : शेतकऱ्यांच्या पाच हजार मदतीवरून थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेचा थेट सरकारला अल्टीमेटम

Loni Kalbhor Accident : भरधाव इलेक्ट्रिक कारची धडक; भाजीविक्रेत्या महिलेचा मृत्यु

SCROLL FOR NEXT