पुणे

Coronavirus : वाहतूक शाखेकडून रिक्षांना मिळतेय परवानगी; पण...

सकाळवृत्तसेवा

पुणे : अत्यावश्यक सेवेसाठी व कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक शाखेने शहरातील 180 रिक्षाचालकांना परवानगी दिली आहे. वाहतूक शाखा व सिटीग्लाइडतर्फे ही एक प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध करुन दिली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या संचारबंदीमध्ये नागरिकांना खासगी वाहने वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी किंवा अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ लागली होती. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांनी रिक्षा उपलब्ध करुन देण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार, वाहतूक शाखेने सिटीग्लाइड यांच्या सहयोगाने 180 रिक्षाचालकांना एका प्रवाशाची वाहतूक करण्यास 24 मार्चला परवानगी देण्यात आली.

24 ते 28 मार्च या कालावधीत 8 हजार 132 जणांनी या सेवेसाठी संपर्क केला. त्यापैकी 866 जणांनी प्रत्यक्षात रिक्षा सेवेचा फायदा घेतल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

अशी मिळेल तुम्हाला रिक्षा सेवा

या रिक्षा सेवेसाठी 9859198591 या क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधित क्रमांकावर प्रवास कोणत्या कारणाकरीता करायचा आहे, याची विचारणा होईल, अत्यावश्यक काम असल्यास ही सेवा मिळणार आहे.
--------------------------

रिक्षा सेवेमध्ये अशी घेतली जातेय काळजी

* सर्व रिक्षाचालक 45 वयोगटाखालील 
* रिक्षा असेल संपूर्णपणे सॅनिटाइज
* प्रवासावेळी चालक/प्रवासी यांना मास्क वापरणे बंधनकारक
* चालकांना सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे बंधनकारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT