पुणे

पान १५ लेख पुस्तकांच्या जगात

CD

पान १५ लेख

पुस्तकांच्या जगात


भावनिक प्रथमोपचार काळाची गरज
-------------
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी औदासीन्य किंवा चिंता यासारख्या मानसिक आजारांना सामोरे जावे लागते. मानसिक आरोग्याच्या प्रश्नांचे वाढते आकडे आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांची कमतरता पाहता भावनिक प्रथमोपचार शिकणे ही काळाची गरज ठरते.
------------
आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी टेन्शन येते. शरीराप्रमाणेच मनदेखील आजारी पडते. ज्याप्रमाणे काही शारीरिक व्याधी घरच्या घरी उपचार करून बऱ्या होतात, मात्र काही मोठ्या आजारांसाठी तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक ठरते. तसेच मनाच्या आजारांचे देखील असते. काही आजारांसाठी तज्ज्ञांकडे जाणे गरजेचे असते, मात्र काही गोष्टी घरच्या घरी भावनिक प्रथमोपचारांद्वारे सावरता येऊ शकतात. डॉ. हमीद दाभोलकर लिखित ‘भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी’ या पुस्तकात भावनिक अस्वस्थता दूर करण्यासाठी स्वमदत कशी करता येईल याची माहिती मिळेल.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभर माणसाला त्रास देणाऱ्या पहिल्या पाच आजारांमध्ये औदासीन्याचा आजार आणि व्यसनाधीनता या दोन मनाच्या आजारांचा समावेश होतो. दर पाच व्यक्तींमागे एका व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी औदासीन्य किंवा चिंता यासारख्या मानसिक आजारांना सामोरे जावे लागते. मानसिक आरोग्याच्या प्रश्नांचे वाढते आकडे आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांची कमतरता पाहता भावनिक प्रथमोपचार शिकणे ही काळाची गरज ठरते.
लेखकाने या पुस्तकाचे सात भाग केले आहेत. पहिल्या भागात लेखक सध्या समाजाला भेडसावणाऱ्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांची चर्चा करतो. माणसाचे मन नक्की कुठे असते? आपल्याला टेन्शन कसे येते आणि ते कसे हाताळायचे? याबद्दल या भागात माहिती मिळेल.
दुसऱ्या भागामध्ये लेखकाने माणसाच्या मनातील अपयश, अपराधीपणा, निराशा, भीती, चिंता, संशय अशा विविध नकारात्मक भावनांचा धांडोळा घेतला आहे. या भावना मनामध्ये कशा निर्माण होतात? त्यांचे आजारात रूपांतर होते का? आणि कसे? हे सांगून लेखकाने त्यामागचे विज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. काही वेळा स्वतःची भावनिक स्थिती ओळखता येणे आणि ती नेमक्या शब्दांत मांडता येणे गरजेचे व पुरेसे असते. तर काही वेळा तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो.

स्वतःचे मन सावरण्यासाठी आपण स्वतःला जी मदत करतो, त्याला ‘भावनिक स्वमदत’ म्हणतात. आपले मन अस्वस्थ आहे हे कसे ओळखायचे आणि ते सावरण्यासाठी काय काय करता येऊ शकते, याची माहिती लेखक तिसऱ्या भागात देतो. लेखक सांगतो, की माणसे लहानपणापासून मनाची अस्वस्थता कमी करण्यासाठी खादाडी करणे किंवा उगीच चिडचिड करणे अशा वेगवेगळ्या गोष्टी कळत नकळत करत असतात. भावनिक प्रथमोपचाराच्या अधिक चांगल्या पद्धती असतात. भावनिक स्वमदत करण्याची पद्धत भावनांची रोजनिशी ठेवून कशी विकसित करता येते हे लेखक उदाहरणांसह समजावून सांगतो.
चौथ्या भागामध्ये लेखक मानवी नातेसंबंधांविषयी बोलतो. भारतासारख्या समाजकेंद्री देशात भावनिक प्रथमोपचारांमध्ये मानवी नातेसंबंध महत्त्वाची भूमिका बजावतात. भावनिक नातेसंबंध जोडण्याच्या तीन पद्धती, भावनिक बुद्धिमत्ता, नाते तुटते तेव्हा काय करावे या सर्व गोष्टींची लेखक चर्चा करतो. मुले आणि पालक, पतिपत्नी तसेच घरातील ज्येष्ठ लोकांच्या नात्यांमध्ये सर्व साधारणपणे कोणते ताणतणाव होऊ शकतात आणि त्याच्यासाठी कोणते भावनिक प्रथमोपचार वापरता येऊ शकतात हे ही लेखक सांगतो.
पुस्तकाच्या पाचव्या भागात लेखक भावनिक प्रथमोपचार करताना पाळायचे पथ्य आणि त्याच्या मर्यादा काय आहेत याबद्दल बोलतो. समुपदेशन म्हणजे काय? त्याची मूलतत्त्वे कोणती? समुपदेशन आणि गप्पा यामध्ये काय फरक आहे? तसेच तज्ज्ञांची मदत कधी घ्यावी याबद्दल लेखक बोलतो.
सहाव्या भागामध्ये लेखक मनाची निगराणी कशी राखावी हे सांगतो. जागतिक आरोग्य संस्थेने सांगितलेली आठ महत्त्वाची जीवन कौशल्ये लेखक विविध उदाहरणे देऊन समजावून सांगतो. ही कौशल्य आपल्याकडे जन्मजात नसली तरीही आपण जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर ती प्रयत्नपूर्वक शिकू शकतो. शेवटच्या लेखामध्ये लेखक भारतात मानसिक आरोग्याची काय स्थिती आहे? यावर थोडक्यात भाष्य करतो.
हे पुस्तक वाचताना आपल्याला अनेक नव्या टिप्स मिळतात. स्वतःच्या भावना कशा ओळखाव्या? त्या ताब्यात ठेवण्यासाठी आणि हाताळण्यासाठी काय करावे? नातेसंबंध कसे टिकवावे? कठीण भावनिक प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी कोणती मदत घ्यावी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकातून मिळू शकतात. तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित विविध शब्द, त्यांचे अर्थ व व्याख्या आपल्याला समजतात. पुस्तकाच्या मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे सामाजिक स्वास्थ्याची आणि मानसिक आरोग्याची जपणूक करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जाणकार बनवणारे हे पुस्तक आहे. राजहंस प्रकाशनाने हे १३० पानी पुस्तक प्रसिद्ध केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संकटात धावून आला ‘लालबागचा राजा’! भुलेश्वरचा राजा मंडळाला ११ लाख, तर मृतांच्या कुटुंबीयांनासाठीही आर्थिक मदत जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : मॉर्निंग वॉकला जाताय, सावधान! पुण्यात रिक्षाचालकाने ज्येष्ठ नागरिकाची ७० हजारांची सोन्याची चैन पळवली

leopard spotted in Satave Kolhapur : आरळे-शहापूर रस्त्यावर दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर; तरुणांनी कॅमेऱ्यात कैद केला थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT