पुणे

पुढच्या पिढ्यांमध्ये टिकेल तेच खरे साहित्य

CD

सोमेश्वरनगर, ता. ३१ : पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा याचा विचार करून लिहिणारे लोक लेखक होऊ शकत नाहीत. तर ईर्षा, द्वेष, मत्सर, भेदाभेद करणारे लेखक कधीच मोठे होऊ शकत नाहीत. ते लाटेसारखे ओसरतात. ज्याच्यात समाजाप्रती करुणा आहे तेच खरे लेखक आणि तेच मोठे होतात. तसेच शंभर-दीडशे किंवा अधिक वर्षांनी पुढच्या पिढ्यांमध्ये टिकून राहिल तेच खरे साहित्य, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले.
अक्षरमानव संघटनेच्या वतीने मुर्टी-मोढवे (ता. बारामती) येथील यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळा येथे एकदिवसीय अक्षरमानव साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. याप्रसंगी ‘लेखन कसे करावे?’ या विषयावर खान यांची कार्यशाळा झाली. यावेळी ते बोलत होते.
‘समारोपाचे पाहुणे समीक्षक डॉ. प्रवीण ताटे देशमुख म्हणाले, ‘‘एकीकडे धोरणांच्या नावाखाली शिक्षणव्यवस्था मोडकळीस आणली जात आहे आणि सोबत सुमारांची सद्दी जाणीवपूर्वक वाढविली जात आहे. अशा वेळी साहित्यिक, चळवळीतील कार्यकर्ते यांनी आपला खरा सांस्कृतिक वारसा घेऊन ताकदीने पुढे आले पाहिजे.’’
संतोष शेंडकर यांनी बारामतीची साहित्य परंपरा या विषयावर मांडणी केली. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष अॅड. आकाश मोरे यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र बालगुडे यांनी केले. तर आभार सोमनाथ सुतार यांनी मानले.

मानवतेचा विचार आवश्यक
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना कवी हनुमंत चांदगुडे म्हणाले, ‘‘ज्ञानोबा-तुकोबांपासून आपल्याला संत साहित्याचा आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा जबरदस्त वारसा आहे. साहित्य संमेलनातून त्या सगळ्यांचा मानवतेचा विचार पुढे घेऊन जाणे आवश्यक आहे. ही जबाबदारी शिक्षक आणि साहित्यिकांचीच आहे.’’

कथाकथन रंगले
संमेलनात बारामती तालुक्यातील कवी आणि कथाकार यांच्या कविसंमेलनाची आणि कथाकथनाची मैफल रंगली. प्रा. रवींद्र कोकरे, ज. तु. गार्डे, राजनंदिनी पडर यांनी विनोदी आणि प्रबोधनात्मक कथा सादर केल्या. तर प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे, डॉ. किरण गाढवे, अलका रसाळ, संगीता देशमुख, वनिता जाधव, सुजाता शिंदे, गुंडराव शइंदे, प्रशांत लडकत, प्रमोद जगताप, उमाकांत भेस्के, जगदीश पिंगळे, सोमनाथ सुतार यांनी कविता सादर केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : लाकडाच्या मागणीत 50 टक्के वाढ

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT