पुणे

शेतीपयोगी औषध विक्री सुरु करण्यावर भर देणार : अनिल कवडे

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करण्याबरोबरच, शेतकरी सभासदांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी गावपातळीवर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाना ऍक्टिव्ह करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयांतर्गत शेतकरी हिताचे विविध उपक्रम राबविण्यासाठी संस्था प्रवृत्त केले जाणार असल्याची माहिती राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे दिली. 

दरम्यान शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी शेतकऱ्यांना सर्व प्रकारची खते, शेतीपयोगी औषधे किफायत दरात मिळावीत यासाठी गावपातळीवरील विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातुन यापुढील काळात गावोगावी ना नफा- ना तोटा या तत्वानुसार खत व शेतीपयोगी औषध विक्री सुरु करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती अनिल कवडे यांनी यावेळी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागा अंतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी निविष्ठा पुरवठा व्यवस्थापन उपक्रमांतर्गत "रोल मॉडेल" म्हणुन लोणी काळभोर येथील लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना सोमवारी (ता. २२) थेट खत वाटपाचा शुभारंभ अनिल कवडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलतांना सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी वरील माहिती दिली.                  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यावेळी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे, उपसंचालक डॉ.. अमोल यादव, विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे, उपनिबंधक डॉ. राजाराम धोंडकर, शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष राहुल काळभोर, उपाध्यक्ष राजेंद्र केसकर, संचालक विठ्ठल काळभोर, प्रताप बोरकर, श्रीरंग काळभोर, आनंदा काळभोर, बाळासाहेब काळभोर, धोंडिबा काळभोर, संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अनिल कवडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन झालेल्या राज्यातील अपवाद वगळता सर्वच विविध कार्यकारी ससहकारी संस्था केवळ केज वाटप म्हणजेच सावकारकीचे काम करत आहेत. ही बाब खटकणारी आहे. विविध कार्यकारी संस्था ग्रामिन अर्थव्यवस्थेचा कना आहेत. गावपातळीवर सहकारी संस्थांनी शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावल्याशिवाय राहणार नाही. शेतक-यांना खते, औषधे व बी बियाणे यांचा वाजवी दरात पुरवून त्यांच्या उत्पादीत शेतमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी वरील संस्थाचा उपयोग केला जाणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अनिल कवडे पुढे म्हणाले, शेतक-यांनी शेतात पिकलेला भाजीपालाही विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून शहरातील गृहनिर्माण संस्थांना किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन सुरु केले आहे. कृषी अर्थव्यवस्था बळकट करुन शेती मधील उत्पादन खर्च कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या साठी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी आता काळानुरुप बदलण्याची गरज आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शेतक-यांना फक्त कर्जवाटप करुन थांबणे योग्य होणार नाही. त्या ऐवजी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी आता नवनवीन व्यवसाय सुरू केले पाहिजेत. संस्थांनी आपल्या सभासदांना नवीन कोणत्या सेवा देता येतील या संदर्भात विचार करावा. वरील संस्थांच्या संचालक मंडळाला या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच एक शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचेही कवडे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT