पुणे

कामगार नेमताना सावधान

CD

पिंपरी, ता. ६ : घरकाम, दुकान, कारखाना तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामासाठी नेमलेल्या काही कामगारांकडून मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत चोरी करण्याचे प्रकार समोर येत आहेत. घरातील मौल्यवान वस्तू, रोकड, दागिने, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साहित्यापासून दुकानातील माल आणि गोदामातील वस्तू लंपास करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कामगार नेमताना त्याची ओळख आणि पूर्वेतिहास तपासणे अत्यावश्यक झाले आहे.
कामगाराची गरज असल्याने अनेक जण कोणतीही चौकशी न करता किंवा केवळ ओळखीच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून कामगार ठेवतात. काही वेळा आधारकार्ड किंवा अन्य ओळखपत्राची प्रत घेतली जाते. मात्र त्याची सत्यता, कायमचा पत्ता, पूर्वीचे कामाचे ठिकाण आणि पूर्वीच्या मालकांकडून माहिती घेण्याकडे दुर्लक्ष केले जाते. याचाच फायदा घेत काही कामगार चोरीचा डाव साधतात.

विश्वास संपादन करून साधतात डाव
कामगार काही दिवस किंवा महिने प्रामाणिकपणे काम करून मालकाचा विश्वास संपादन करतात. घरातील कोणत्या ठिकाणी पैसे किंवा दागिने ठेवले जातात, मालक कधी घराबाहेर असतो, याची माहिती घेतली जाते. त्यानंतर संधी साधून वस्तू लंपास केल्या जातात.

कोणत्या वस्तूंवर डल्ला?
- घरातील रोकड, सोन्या-चांदीचे दागिने
- मोबाईल, लॅपटॉप व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू
- दुकानातील महागड्या वस्तू व साहित्य
- गोदामातील माल व कच्चा माल
- वाहनांचे सुटे भाग
- कंपनीतील उपकरणे व साधनसामग्री
- ऑनलाइन व्यवहारासाठी वापरली जाणारी उपकरणे किंवा कागदपत्रे

अशी घ्या काळजी
- ओळखपत्राची पडताळणी करा
- कायमचा पत्ता तपासा
- पूर्वीच्या मालकांशी संपर्क साधा
- पोलिसांकडे नोंदणी करा
- महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित ठेवा
- सीसीटीव्हीचा वापर करा
- प्रवेशावर मर्यादा ठेवा

मागील महिनाभरातील घटना
- घरकाम करणाऱ्या एका महिलेने घरातील देवाचा सोन्याचा हार चोरल्याचा प्रकार शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला.
- महाळुंगे येथे कंपनीतून वायरचे बंडल चोरी करणाऱ्या कामगाराला सुरक्षारक्षकाने पकडले.
- चिंचवड, मोहननगर येथील एका वाहन सर्व्हिस सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका मुलाने ई-वाहन बॅटऱ्या आणि मोटारी चोरल्या.
- भोसरी येथे एका फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्याने ग्राहकांकडून कर्ज बंद करण्यासाठी आलेली पावणे चार लाखांची रोकड उकळली.

कोणताही कामगार कामावर ठेवताना त्याची सर्व माहिती घेणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीची पोलिस चारित्र्य पडताळणी करावी. चोरीचा प्रकार समोर आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.
- धीरज पाटील, पोलिस उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

SCROLL FOR NEXT