pune municipal corporation  Sakal
पुणे

कर्मचाऱ्यांच्या गणवेशाची तपासणी होणार

पुणे महापालिकेच्या सेवकांकडून गणवेश घालण्यास टाळाटाळ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या सेवकांना गणवेश बंधनकारक असताना, साध्या कपड्यांमध्ये हे कर्मचारी महापालिकेत काम करत आहेत. मात्र, आता प्रशासनाने यासंदर्भात परिपत्रक काढून सेवकांनी गणवेश परिधान करावा असे आदेश दिले आहेत. त्यावर नजर ठेवण्यासाठी एका अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. सेवकांकडून गणवेश घालण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते.

पुणे महापालिकेतील बांधकाम विभाग, घनकचरा विभाग, अग्निशामक विभाग यासह इतर विभागातील सेवक व शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना गणवेश बंधनकारक आहे. त्यासाठी त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात. महापालिकेसह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सेवक हे रंगेबीरंगी शर्ट, टीशर्ट, जीन्स, स्पोर्ट बूट अशा गणवेशात वावरतात, त्यामुळे नागरिकांना कार्यालयाबाहेर सेवक कोण आहेत हे कळत नाही. तसेच कार्यालयीन शिस्तीचाही भंग होत आहे. विभाग प्रमुखांनी गणवेश घातला नसल्याचे निदर्शनास आणून दिले तरी बहुतांश कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, आता अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी यासंदर्भात आदेश काढून गणवेश घालणे बंधनकारक केले आहे.

कर्मचाऱ्यांनी त्यांना बंधनकारक असलेला गणवेश स्वच्छ, निटनेटकेपणे घालणे आवश्‍यक आहे.याची तपासणी खातेप्रमुखांनी करावी. तसेच कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी त्यांची जबाबदारी सांभाळून महापालिकेत कर्मचारी गणवेश घातला आहे की नाही याची तपासणी करावी, असे बिनवडे यांनी आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT