पुणे

सांगली : जिल्ह्यातील ‘रोजगार हमी’ आराखडा अंतिम टप्प्यात

CD

सांगली जिल्ह्यात ‘रोजगार हमी’
आराखडा अंतिम टप्प्यात

ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मागेल त्याच्या हाताला काम देण्यासाठी ‘रोजगार हमी’ कामाच्या आराखडा निश्चितीची प्रक्रिया गतीने सुरू आहे. पुढील आठवडाभरात आराखडा तयार होईल आणि त्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. दुष्काळी तालुक्यात कामांना प्राधान्य दिले जाणार असले, तरी जिल्हाभर ही कामे केली जाणार आहेत. अशी माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव यांनी दिली.

जिल्ह्यातील चार तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यात आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज आणि जत तालुक्याचा समावेश आहे. अन्य खानापूर, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा आणि वाळवा तालुक्यांतही टंचाई स्थिती असून तेथेही दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी केली जात आहे. राज्य शासनाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा निधी आणि जिल्हा नियोजनाचा निधी प्राधान्याने खर्च करण्याचे धोरण राबवले आहे. त्यात रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यातही जलसुरक्षेच्या दृष्टीने कामे करण्यास महत्त्व असेल.
विजया यादव म्हणाल्या, यात बंधारे बांधणे, बांधबंदिस्ती करणे, भूजल पुनर्भरण, विहिरी व नद्या-नाले यांचे खोलीकरण करणे, ठिबक व तुषार सिंचन आणि पावसाच्या पाण्याची साठवणूक करणे अशा कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Gokul Election Final List : गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीची अंतिम यादी जाहीर; अनेकांचा पत्ता कट, पी. एन. पाटील गटाला धक्का, अनेकजण सतेज पाटलांच्या संपर्कात

PM Modi On Nana Patekar : 'त्यांनी कधीच संकोच बाळगला नाही...'; नानांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींचे शब्द चर्चेत, म्हणाले...

लोकं म्हणतील नानाचा मुलगा असा कसा? दुसऱ्या मुलाचा तिरस्कार करायचे नाना, आयुष्यभर मनात राहिली ती सल

Instagram च्या शेअर मेन्यूमध्ये आला 'MUSE AI' एजंट; युजर्सची कामे होणार सोपी! जाणून घ्या खास फीचर्स...

Latest Marathi News Live Update : बंगळुरू येथे सीजेपीचे आंदोलन सुरू, आंदोलनात ध्रुव राठी सहभागी

SCROLL FOR NEXT