आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार मार्गदर्शन
आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार मार्गदर्शन 
पुणे

आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार मार्गदर्शन

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे): राज्य सरकारच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षापूर्व मोफत प्रशिक्षणसत्र 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया व मुलाखतीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र मंचर (ता. आंबेगाव) पोस्ट कार्यालय इमारतीत (घोडेगाव रस्ता) बुधवारी (ता. 25) सकाळी दहा वाजता स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख एस. बी. मोहिते यांनी दिली.

मोहिते म्हणाले, "प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना एक हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. 98 व्या प्रशिक्षणसत्रात सरकारच्या शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये वर्ग तीन या पदाची नोकर भरती कर्मचारी निवड (लिपिक, टंकलेखक, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे रिक्‍रयुटमेट आयोग, लोकसेवा आयोग) यांच्या मार्फत स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड केली जाते. उमेदवारांना साडेतीन महिने कालावधीचे स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणात गणित, इंग्रजी लिपिक योग्यता, बौद्धिक चाचणी व सामान्यज्ञान हे विषय शिकविले जातात. उमेदवारांना स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केले जाते. 18 ते 38 वयोगटातील दहावी उत्तीर्ण मुला मुलींसाठी प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये निवास व भोजनाची व्यवस्था उमेदवारांना स्वतः करावी लागेल. उमेदवारांनी सर्व मूळ शैक्षणिक पात्रतेच्या व सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीच्या दाखल्यासह बुधवारी (ता. 25) सकाळी दहा वाजता मंचरच्या कार्यालयात उपस्थित राहावे. दूरध्वनी क्रमांक 02133 (223081) यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

1181 उमेदवारांना रोजगार
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर येथील आदिवासी उमेदवारांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये दोन हजार 571 उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यापैकी एक हजार 181 उमेदवारांनी शासकीय व निमशासकीय खासगी आस्थापानेमध्ये रोजगार मिळालेला आहे. युवक व युवतींनी मोफत प्रशिक्षणाची संधी घ्यावी, असे आवाहन कनिष्ठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन अधिकारी मारुती तळपे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT