रोजगार, असंघटित उद्योग
क्षेत्राचा व्यापक सर्वे सुरू
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २४ : महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनच्या (मित्रा) सहकार्याने अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण सुरू झाले आहे. काही निवडक कुटुंबे व आस्थापनांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांनी प्रगणकांना अचूक व सत्य माहिती देणे आवश्यक आहे. संकलित केलेली माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे.
या सर्वेक्षणाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सांख्यिकी कार्यालयाच्या उपआयुक्त संगीता मोरे, सांख्यिकी अधिकारी दिनकर बंडगर व कर्मचारी उपस्थित होते. या सर्वेक्षणाद्वारे रोजगाराची स्थिती, श्रमशक्ती सहभाग दर, स्वयंरोजगार, लघु व असंघटित बिगर कृषी क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांची स्थिती, कामगारांचे उत्पन्न आदी आर्थिक विकासाच्या मोजमापासंबंधीची सांख्यिकीय माहिती संकलित करण्यात येणार आहे. या आधारे जिल्हास्तरीय विकास आराखडे तयार करणे, रोजगारविषयक धोरणे निश्चित करणे, उद्योग व गुंतवणूक क्षेत्रांना चालना देणे, तसेच राज्याच्या व देशाच्या विकासाचे अचूक चित्र समोर आणणे शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.