पुणे

विठ्ठलवाडीत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

CD

तळेगाव ढमढेरे, ता.१७ : श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यातर्फे शेतकऱ्यांसाठी ऊसपीक परिसंवाद आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांच्यातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच कांतिलाल गवारी होते. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगन्नाथ गवारी, पांडुरंग विद्या मंदिरचे माजी मुख्याध्यापक रामराव दौंडकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते दादासाहेब गवारी, निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. नागनाथ शिंगाडे, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी दीपक रोडे आणि पर्यावरण क्षेत्रातील प्रवीणकुमार जगताप यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व फळ झाडाचे रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी दीपक रोडे यांनी ऊस पिकाच्या पूर्वमशागतीपासून ते उत्पादनवाढीपर्यंतच्या विविध पैलूंवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यातर्फे फळझाडांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक काळूराम गवारी, घोडगंगा कारखान्याचे संचालक सोपानराव गवारी, माजी संचालक हिरामण गवारी, लव्हाजी लोखंडे, राहुल गवारी, लोभाजी आल्हाट, दिलीप गवारी, राजेंद्र शिंदे, बबन गवारे, बापू पवार, युवराज गवारी, रायचंद शिंदे, हरिभाऊ गवारी, शांताराम गवारी, ज्ञानेश्वर राऊत, बाळासाहेब गवारी, किसन गवारी, राजेंद्र केदारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
ॲड. संतोष गवारी यांनी प्रास्ताविक तर मधुकर दोरगे यांनी सूत्रसंचालन केले. वैभव गवारी यांनी आभार मानले.


09561

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dimaagi Naxal Party: ‘कॉकरोच’नंतर आता ‘दिमागी नक्सल पार्टी’! मोदींच्या वक्तव्यावरून नवा राजकीय ट्विस्ट; रातोरात लाखो फॉलोअर्स

MP Dr. Amol Kolhe : माळशेज भोरांडे प्रकल्पासारखे एकूण 59 प्रकल्प आगामी काळात राज्यात प्रस्तावित

Marathi News Live Updates : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे संशोधन क्षेत्रासाठी १५० एकर जमीन आहे - शरद पवार

Viral Video: शेवटच्या बॉलवर ड्रामा! ४ धावांची गरज, चौकार न जाताच संघाचा जल्लोष; पण नंतर जे घडलं ते पाहून सर्वच अवाक

MP Supriya Sule : महापालिकेस राज्यातील शाळा, शिक्षणाबाबत सरकारची भूमिका उदासीनच

SCROLL FOR NEXT