पुणे

एकल दिन

CD

एकल महिलांना विविध योजनांचे प्रमाणपत्रांचे वाटप
सातारा, ता. २३ : एकल महिला दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यक्रमात गरजू पात्र एकल महिलांना रेशनकार्ड, बालसंगोपन योजना लाभ प्रमाणपत्र संजय गांधी निराधार योजना प्रमाणपत्र, श्रावणबाळ योजना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपाध्यक्ष राजू भोसले, महिला बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नागेश ठोंबरे, अर्थ व शिक्षण, क्रीडा सभापती तेजस्विनी कदम, समाज कल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती लता कर्णे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांसाठी उपयुक्त अनेक शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल लावले होते. स्वयम सामाजिक संस्थेमार्फत महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रिया शिंदे म्हणाल्या, ‘‘स्वयंभू महिला हीच खरी भगिनींच्या स्वाभिमान स्वावलंबन व सक्षमीकरणाची नांदी आहे. याशनी नागराजन यांनी महिला बचत गट हा ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा कणा असून, जास्तीतजास्त महिलांनी बचत गटात सहभागी होऊन आर्थिक सक्षम व्हावे.’’ ऋतुजा शिंदे यांनी महिलांनी सक्षम व्हावे, आपल्या पायावर उभे राहणे, ही काळाची गरज असून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन महिलांना दिले. जिल्हा विधी प्राधिकरणाच्या वतीने महिलांना मार्गदर्शन केले. सारिका ढाणे यांनी सूत्रसंचालन केले.
..............
29436
सातारा : एकल महिला दिनानिमित्त आयोजित मंगळवारी कार्यशाळेचे उद्‍घाटन करताना डॉ. प्रिया शिंदे, संतोष पाटील, याशनी नागराजन, यावेळी उपस्थित राजू भोसले, ऋतुजा शिंदे.

..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट समोर, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

Sonvi Bridge Accident in Sangameshwar : सोनवी पुलावर दोन ट्रकची धडक; एकाच मार्गिकेतून दुहेरी वाहतुकीचा फटका; महामार्गावर वाहनांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : महाबळेश्वरमध्ये १५७ मिलीमीटर पावसाची नोंद

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्यासाठी RR नंतर आणखी एक संघ मैदानात, कर्णधारपदाची ऑफर; मराठमोळ्या खेळाडूची 'वापरा अन् फेकून द्या' अशी होणार अवस्था

Pune Rain Update : पुण्यात रात्रभर पावसाची संततधार, अनेक भागांत साचले पाणी; वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त, वाहनांच्या लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT