पुणे

हर्षदा देशमुख मुलाखत

CD

कौशल्यविकासासह रोजगारनिर्मितीला प्राधान्य
लीड
---------
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, आधुनिक तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या भविष्यासंदर्भात पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांची विशेष मुलाखत.

प्रश्न : शिक्षण क्षेत्रातून सार्वजनिक जीवनात येण्यामागची भूमिका काय?
हर्षदा देशमुख-जाधव : शिक्षण क्षेत्रात काम करताना हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि पदवीधर युवकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता आणि क्षमता असूनही योग्य मार्गदर्शन व रोजगाराच्या संधींचा अभाव जाणवतो. शिक्षण आणि रोजगार यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी धोरणात्मक पातळीवर काम करण्याची गरज आहे. याच विचारातून सार्वजनिक जीवनात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला.

प्रश्न : आजच्या पदवीधरांसमोरील सर्वात मोठे आव्हान कोणते?
उत्तर : पदवी मिळाल्यानंतरही अपेक्षित रोजगार मिळत नाही, ही अनेक युवकांची प्रमुख समस्या आहे. उद्योगांच्या गरजा आणि विद्यार्थ्यांकडे असलेली कौशल्ये यामध्ये मोठे अंतर आहे. प्रत्येक जिल्ह्यात करिअर मार्गदर्शन, कौशल्यविकास आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाच्या सुविधा वाढविणे आवश्यक आहे. पदवीधरांनी केवळ नोकरी शोधण्यापुरते मर्यादित न राहता उद्योजकतेच्या संधींचाही विचार केला पाहिजे.

प्रश्न : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाबाबत आपली भूमिका काय?
उत्तर : जग वेगाने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, डिजिटल तंत्रज्ञान आणि आॅटोमेशन यामुळे रोजगाराचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. डिजिटल साक्षरता केवळ संगणक वापरण्यापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रोजगारक्षम बनवणारी असावी. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत या संधी पोहोचणे आवश्यक आहे.

प्रश्न : ग्रामीण भागातील पदवीधरांसाठी कोणत्या संकल्पना आहेत?
उत्तर : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. ग्रामीण युवकांसाठी जिल्हास्तरावर रोजगार व करिअर मार्गदर्शन केंद्रे, डिजिटल कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योजकता मार्गदर्शनाची व्यवस्था विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

प्रश्न : पदवीधरांच्या प्रश्‍नांकडे तुम्ही कशापद्धतीने बघता

उत्तर : शिक्षणाचा खरा उद्देश केवळ पदवी मिळवणे नसून स्वतःचे भविष्य घडवण्याची क्षमता निर्माण करणे हा आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख शिक्षण ही काळाची गरज आहे. प्रत्येक पदवीधराला गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि प्रगतीची संधी मिळावी, यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT