Encroachment and traffic jam on Baramati Hostel to Kusalkar Statue Chowk.jpg 
पुणे

अनाधिकृत बांधकामामुळे बस चालकांची कसरत

समाधान काटे

गोखलेनगर (पुणे) : बारामती हॉस्टेल ते कुसाळकर पुतळा चौक या मार्गावर अतिक्रमण व वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. वाहने उभी करण्यासाठी जागा न सोडता रस्त्यावर अनाधिकृत बांधकामे करून उद्योग थाटले आहेत. अतिक्रमाण विभाग, वाहतूक विभाग याकडे डोळेझाक करीत असून या रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. 

शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बारामती हॉस्टेलजवळ दोन पी.एम.टी बस रस्त्याने जात असताना रस्त्याच्या बाजूला उभा केलेल्या गाड्यामुळे त्या वाहतूक कोंडीत आडकल्या होत्या. दोन मोठ्या गाड्या समोरासमोर आल्यावर सदरील रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने रस्ता वाहतूकीसाठी कमी पडत आहे. दुकानामध्ये खरेदीसाठी आलेले नागरिक रस्त्यावर वाहने उभी करतात. दुकानदारांनी वाहने उभी करण्यासाठी जागा न सोडल्याने वाहतूक कोंडी व अतिक्रमण झाले आहे.

जमतेम ८० फूटाचा रस्ता असताना देखील तळमजल्यावर पार्कींग सोडलेली नाही. तळमजल्यावर जवळपास सर्वांचेच व्यावसाय आहेत. यामुळे गोखलेनगरचा मुख्य रस्त्याचा प्रश्न जटील होत आहे.

रस्त्यावर अतिक्रमण असेल तर अतिक्रमण निरिक्षण आहेत त्यांना सांगून ते हटवायला सांगते. अनाधिकृत बांधकाम संबंधात संबंधित बांधकाम विभागाला कळवले जाईल.
- आशा राऊत, शिवाजीनगर - घोलेरस्ता क्षेत्रीय अधिकारी

पार्कींग सोडलेले नाही. तळमजल्याचा वापर व्यावसायिकांनी केला आहे. सकाळी दहा, सायंकाळी पाच नंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. दुकानदारांनी पार्किंगची व्यवस्था करायला हवी.
- शैलेश हेंद्रे स्थानिक नागरिक.

रस्त्यावर वाहने असतील तर कारवाईसाठी गाडी पाठवत आहे. लवकरच कारवाई केली जाईल.
 - प्रकाश मासळकर, वाहतूक पोलिस निरीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT