Indrayani-River-Encroachment
Indrayani-River-Encroachment 
पुणे

अनधिकृत २२ बांधकामांवर गुन्हे

पीतांबर लोहार

पिंपरी - अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअंतर्गत ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत इंद्रायणी नदीपात्रालगत उभारलेल्या हॉटेल मालकासह तळवडे, चिखली परिसरातील अनधिकृत बांधकामे करणाऱ्या २२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, त्याची पर्वा न करता काही ठिकाणी बिनधास्तपणे अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे सोमवारी ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत आढळले. 

शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न वारंवार चर्चेला जात आहे. अशा बांधकामांवर महापालिका वेळोवेळी कारवाई करीत असते. तरीही अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अशा ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय कक्षेत चिखली, तळवडे, म्हेत्रे वस्ती, साने चौक परिसरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली आहे. तरीसुद्धा काही ठिकाणी बांधकामे सुरू असल्याचे सोमवारी आढळले. 

हॉटेल मालकावर गुन्हा
तळवडे येथे इंद्रायणी नदीपात्रालगत निळ्या पूररेषेत उभारलेल्या हॉटेल मालकाविरुद्ध देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मच्छिंद्र भालेकर असे हॉटेल मालकाचे नाव आहे. महापालिकेचे उपअभियंता नितीन निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे. या हॉटेलविरुद्ध काही दिवसांपूर्वी हरित लवादानेही महापालिकेकडे तक्रार केली होती. जलसंपदा विभागाने निश्‍चित केलेली निळी पूररेषा व नदीपात्र यामध्ये कोणतेही बांधकाम करता येत नाही. 

मात्र, निळी व लाल पूररेषेत काहीअंशी बांधकाम परवानगी दिली जाते. मात्र, त्या बांधकामाच्या जोत्याची उंची पूररेषेपेक्षा अधिक असावी, असे निंबाळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

महापालिका अधिनियमानुसार कारवाई
 कलम २६० : नियमाविरुद्ध केलेल्या बांधकामांवर कार्यवाही
 कलम २६१ : नियमाविरुद्ध केलेले बांधकाम तोडता येईल
 कलम २६४ : धोकादायक बांधकाम पाडणे
 कलम २६७ : बेकायदा बांधकाम करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई
 कलम ३९७ अ : कलम २६०, २६१, २६४, २६७ व ४७८ नुसार दिलेल्या नोटिशींचे पालन न केल्याबद्दल शिक्षा करणे 
 कलम ४७८ : महापालिका आयुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय बांधकाम करणे

पंचवीस वर्षांच्या कालावधीत आलेल्या सर्वाधिक पुराची रेषा जलसंपदा विभागातर्फे निळी पूररेषा म्हणून निश्‍चित केली जाते. नदीपात्रापासून निळ्या पूररेषेपर्यंत केलेले बांधकाम बेकायदा ठरते. त्यानुसार तळवडेतील हॉटेल मालकाविरुद्ध कारवाई केली आहे.
- नितीन निंबाळकर, उपअभियंता, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन बी काय आहे? अमित शाह काय म्हणाले जाणून घ्या...

IPL 2024: हैदराबादनेही प्लेऑफचं तिकीट केलं पक्कं! आता RCB vs CSK सामना लावणार चौथ्या संघाचा निकाल, पाहा कसं आहे समीकरण

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT