Encroachment Sakal
पुणे

Video : मेट्रोसाठी मंडईतील दुकाने हटविली; ७० जणांचे पुनर्वसन

महात्मा फुले मंडई येथे भूमीगत मेट्रोचे स्थानकाचे काम सुरू होणार असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या मंडई इमारतीच्या परिसरातील दुकान हटवून हा परिसर रिकामा केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महात्मा फुले मंडई (Mahatma Phule Mandai) येथे भूमीगत मेट्रोचे स्थानकाचे (Metro Station) काम (Work) सुरू होणार असल्याने महापालिकेच्या (Municipal) अतिक्रमण (Encroachment) विभागाने या मंडई इमारतीच्या परिसरातील दुकान हटवून हा परिसर रिकामा केला. (Encroachment Crime in Mandai for Metro Station)

Mandai

महामेट्रोतर्फे स्वारगेट ते शिवाजीनगर या दरम्यान भूमीगत मेट्रोचे काम सुरू आहे. मंडई परिसरात मेट्रो स्थानक येणार आहे, त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तेथील व्यवसायिकांचे इतरत्र स्थलांतर करण्यासाठी चर्चा सुरू होती. मंडईतील व्यावसायिकांनी त्यांचे व्यवस्थित पुनर्वसन व्हावे साठी आग्रही होते.

महापालिकेने हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ आणि काका हलवाई दुकानामागील जागेत किराणा दुकानदार, फळविक्रेते, पान विक्रेते यासह इतरांसाठी गाळे बांधले आहे. या व्यावसायिकांनी तेथे जावे यासाठी महापालिकेने शनिवारी सकाळी पोलिस बंदबोस्तामध्ये दुकाने हटविण्याची कारवाई सुरू केली. महापालिकेने व्यावसायिकांना विश्‍वासात न घेता, नोटीस न देता कारवाई केली आहे. याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा व्यावसायिकांनी दिला असून, महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.

Crime

‘मंडईत मेट्रो स्टेशन होणार असल्याने या भागातील अधिकृत किराणा, फळविक्रेते, पान विक्रेते या ७० दुकानदारांचे पुनर्वसन करण्यासाठी गाळे बांधले आहेत. त्याचे वाटप करण्यात आले आहे. या ठिकाणी काम सुरू होणार असल्याने ही जागा शनिवारी सकाळी कारवाई करून रिकामी करण्यात आली आहे. कारवाई करताना सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले आहे.’

- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग

Encroachment

‘मेट्रोचे काम सुरू होणार असल्याने मेट्रोच्या आराखड्यानुसार आमचे पुनर्वसन करा आम्ही सहकार्य करतो असे सांगितले होते. तरीही आज सकाळी नोटीस किंवा पूर्वसूचना न देता कारवाई करण्यात आली. महापालिकेचे अधिकारी, राजकीय नेते व पोलिसांनी संगनमत करून ही कारवाई केली आहे. याविरोधात न्यायालयात जाणार आहोत.’

- सोमनाथ काची, अध्यक्ष, मंडई गाळेधारक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

Alandi News : विनर्स अकॅडमीवर नगरपरिषदेची कारवाई; इमारत सील

SCROLL FOR NEXT