पुणे

निगडी-दापोडी बीआरटी मार्गावर अतिक्रमणांचे पेव

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर चिंचवडस्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. हातगाडी व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, पदपथाचा पार्किंगसाठी वापर करणारे दुचाकीचालक, रस्त्यालगत मोटारी उभ्या करणाऱ्यांनी सायकल ट्रॅक, पदपथ गिळंकृत केले आहेत. 

बीआरटी बसमार्ग सुरू करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवार (ता. 24) आणि बुधवार (ता. 25) नुकतीच पाहणी करण्यात आली. त्या पार्श्‍वभूमीवर चिंचवडस्टेशन परिसरातील अहिंसा चौक ते महावीर चौकापर्यंतची "सकाळ'च्या प्रतिनिधीने पाहणी केली. त्या वेळी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. पुण्याहून मुंबईकडे जाताना अहिंसा चौकातून पुढे जाताना डाव्या बाजूला पदपथ, सायकल ट्रॅकवर हातगाडी व्रिकेते, दुचाकीचालक, रिक्षाचालक यांचे अतिक्रमण दिसले. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही मुश्‍कील होते. या परिसरातील अनेक इमारतींना पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे वाहने रस्त्याच्या कडेला लावण्याचे प्रमाण मोठे आहे. काही पुणे-मुंबई अशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक जीप, प्रवासी मोटारीअंतर्गत मार्गावर उभ्या होत्या. 

महावीर चौकातून डावीकडे चिंचवड रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातगाडी विक्रेते आहेत. उजवीकडच्या बाजूला सेवारस्त्यावर भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. येथे तर पदपथच नाही. या चौकात महामार्गावरच रस्त्याच्या कडेला रिक्षा बेशिस्तपणे उभ्या होत्या. त्यामुळे येथून जाणाऱ्यांना कोंडीचा सामना करावा लागत होता. येथून उजवीकडे पिंपरी पोलिस ठाण्याकडे वळाल्यावर लगेचच बीआरटी बस स्थानक आहे. येथेही बीआरटी सुरू झाल्यावर बस स्थानकात बस उभी राहिली तर पदपथ आणि स्थानकात उभ्या बसच्या मध्ये केवळ दहा फुटी रस्ता शिल्लक राहतो. येथून जाणाऱ्या वाहनांची संख्या आणि दिवसेंदिवस त्यात नवीन वाहनांची पडणारी भर याचा विचार करता येथे रोजच कोंडी होणार असल्याचे चित्र आहे. याच दहा फुटी रस्त्यावर मोटारीही उभ्या असतात. बुधवारी (ता. 25) दिवसभरात येथे सुमारे 40 चारचाकी वाहनांवर "नो-पार्किंग' बद्दल दंडात्मक कारवाई केली. या परिसरातीलही अनेक इमारतींना पुरेसे पार्किंग नाही. कार पार्किंग तर बहुधा कोठेच नाही. येथील दुकाने, हॉटेल येथे येणाऱ्या ग्राहकांनाही त्यांच्या दुचाकी पदपथावरच लावाव्या लागतात. दोन इमारतींमधील तुटपुंज्या जागेत काही दुचाकीच लावता येऊ शकतात, अशी स्थिती आहे. 

चिंचवड स्टेशन येथील बीआरटी मार्गातील अतिक्रमणे काढण्याबाबत संबंधित विभागाला सांगतो. तसेच "नो-पार्किंग'मध्ये वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बीआरटी सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.'' 
- विजय भोजने - प्रवक्ते, बीआरटी विभाग - महापालिका 

बीआरटी सुरू करताना महापालिका प्रशासनाने चिंचवड स्टेशन परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या अतिक्रमणांवर कारवाई करावी. तसेच महामार्गावर रस्त्याच्या कडेलाच थांबणाऱ्या मोटारी, रिक्षा व्यावसायिक यांनाही वाहतूक पोलिसांनी प्रतिबंध करावा. 
- सचिन वाघोले, नागरिक - आकुर्डी 

बीआरटी मार्गाची रुंदी - 61 मीटर 
द्रुतगती मार्ग रुंदी - 21 मीटर 
सायकल ट्रॅक - 2.5 मीटर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Credit Card: शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत कर्ज! कोणती बँक देते सर्वात स्वस्त कर्ज? पात्रता, व्याजदर आणि अर्जाची संपूर्ण माहिती

BAN vs CA XI : बांगलादेशचा संघ ५४ धावांत तंबूत! ऑस्ट्रेलियन Campbell Thompson ने घेतल्या ८ विकेट्स; कसोटी मॅच डावाने जिंकली

Ichalkaranji Firing Incident : कबनूरमध्ये रील बनवणं बेतलं जीवावर! हवेत फैरी झाडताना गोळी थेट कवटीत घुसली, रक्तबंबाळ होऊन नीलेश जागीच कोसळला

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये FDAची मोठी कारवाई! ५ उद्योगांवर धाड; १,९४,५०,९२२ किंमतीचे तेल जप्त

मुंबईत भररस्त्यात बर्थडेचा धिंगाणा! बोनेटवर केक कटिंग अन् एअरगनने गोळीबार, भाजप कार्यकर्त्यासह १० जणांना अटक; Video Viral

SCROLL FOR NEXT