पुणे

मी बुलडोझर खाली झोपलो असतो; राऊत

आंबिल ओढा परिसरातील कारवाईबाबत ऊर्जामंत्र्यांचे सूचक वक्तव्य

शरयू काकडे

पुणे : भर पावसाळ्यात आणि कोरोनासारखी आपत्ती असताना आंबिल ओढ्यावरील कारवाई करताना महापौर आणि अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे होती, अशा तिखट शब्दात महापालिकेच्या कारभारावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी टीका केली. नागपुरात अशी कारवाई झाली असती, तर मी बुलडोझर खाली झोपलो असतो, असे सूचक वक्तव्य मंगळवारी केले.

महापालिकेकडून कारवाई करण्यात आलेल्या आंबिल ओढ्याच्या परिसरातला राऊत यांनी भेट दिली. तेथील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर यांनी याप्रकरणी महापालिकेत जाऊन आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. तसेच राज्य सरकारला देखील या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत आपण विनंती करणार असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘या कारवाई मागे महापालिकेतील सत्ताधारीच आहेत’, असेही ते म्हणाले.

राऊत म्हणाले, ‘‘पावसाळ्यात अशी करवाई करता येत नाही. कोरोनाच्या काळात नियम पाळायचे असताना शेकडोंच्या संख्येने ही कारवाई करण्यात आली. दलितांवर अन्याय झाला आहे. ती गप्प बसणार नाही. मी लढणार आहे.’’ यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, अभय छाजेड, दीप्ती चवधरी, अजित दरेकर, गोपाळ तिवारी, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांबाबत अधिक बोलणे टाळले

महापालिकेकडून भर पावसात आंबिल ओढ्याच्या परिसरात राक्षसी वृत्तीने आणि दंडेलशाहीने घरे उद्‍ध्वस्त करण्यात आली. स्त्रियांना हात लावण्यात आले. त्याचा मी निषेध करतो, असे नितीन राऊत म्हणाले. या कारवाईमागे पालकमंत्री अजित पवार यांचा हात असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘पुण्याच्या पालकमंत्र्यांनी हे केले आहे, असा कुठेही दाखल नाही,’ असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT