पुणे

Video : इंजिनिअर, आर्किटेक्ट यांनी स्वतः बनविले अडीच हजारांहून अधिक मास्क

सुवर्णा नवले

पिंपरी : केवळ आपल्या क्षेत्रापुरते मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने ते नागरिकांसाठी वॉरियर्स ठरले आहेत. टेलरिंगचे ज्ञान अवगत नसूनही काही दिवसांत ते आत्मसात करून त्यांनी मास्क तयार करण्याचा चंग बांधला अन्‌ तो पूर्णत्वास नेला. वास्तुविशारद, अभियंता अन्‌ उद्योजकांनी एकत्रित येऊन मजूर व आर्मीच्या जवानांसाठी अडीच हजारांहून अधिक मास्क तयार केले आहेत.

निगडी-प्राधिकरण स्वप्नपूर्ती सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी एकत्रित येऊन हा उपक्रम राबविला आहे. व्हॉट्‌सऍपग्रुपवर सर्व सोसायटी धारकांना संकल्पना समजावून सांगितली आणि सर्वांनी त्यास होकार दिला. सोसायटीतील एकाला शिलाईमशीन काम माहीत होते. त्यातून पाच शिलाई मशिन जमा झाल्या. सोसायटीतील कार्यालयातच मास्क तयार करण्यास सुरूवात करण्यात आली. बऱ्याच जणांना सुरवातीला शिलाई करणे अवघड वाटले. मात्र, अल्पावधीत सर्वांनी शिलाईत प्रावीण्य मिळविले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सोसायटीतून सर्वांकडून नवीन कापड जमा झाले. कापडाचे सॅनिटाइज करून कटिंग करण्यात आले. सर्वांनी व्यवस्थित कामाचे वाटप केले. सर्वांत आधी सोसायटीत सर्वांना मास्क वाटप केले. तयार केलेले मास्क देहू सेंट्रल ऑर्डनन्स डेपोच्या जवानांना व रेल्वे स्टेशनवरील मजूर, स्वच्छता कर्मचाऱ्यांना वाटप केले. अद्यापही हे मास्क बनविण्याचे काम सुरू आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

यांनी दिले योगदान...

बाळ भिंगारकर, मामा म्हैसकर, उमेश श्रावगे, अनिल पत्की, अलेक्‍स झुझड, संतोष पुरोहित, प्रशांत पेडणेकर, कुमार कुलकर्णी, अमित सव्वालाखे, रोशन मेहरा, हरीश परमार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur Accident: बाबरगाव फाट्याजवळ भीषण अपघात; पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी पतीनेही घेतला अखेरचा श्वास

NDA : पुण्यात एनडीएच्या १५१ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा उत्साहात; १,२५० छात्र सहभागी, ३६४ जण अधिकारी पदवीधर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मार्गदर्शन

राहुल गांधी अन् एम. के. स्टॅलिन यांची गळाभेट! द्रमुक भूमिका बदलणार? चेन्नईतल्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Electric Shock: व्यायामासाठी पहाटे घराबाहेर पडला, पण परतलाच नाही; डीपीजवळ विजेचा धक्का लागून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Devendra Fadnavis: स्काऊट गाईडच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस; सदस्यसंख्या ५ कोटींवर नेण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT