पुणे, ता. ३ : राज्यात अभियांत्रिकीच्या (बी.ई/बी.टेक) अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेची चौथी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत ८८ हजार ४८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. या यादीमध्ये आठ हजार १२८ विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशाची प्रथमच संधी उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) बी.ई. आणि बी.टेक अभ्यासक्रमाची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. तिसऱ्या फेरीअंती ६० हजार ८३९ विद्यार्थ्यांनी ‘बेटरमेंट’चा पर्याय स्वीकारला होता. चौथ्या फेरीत सहभाग घेतला, परंतु या विद्यार्थ्यांचे बेटरमेंट झाले नाही. यामुळे या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत मिळालेले महाविद्यालयच पुन्हा मिळाले. यावर्षी राज्यात एकूण दोन लाख तीन हजार २९३ जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी एक लाख ८१ हजार २८३ विद्यार्थ्यांना आतापर्यंत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीमध्ये जागा वाटप केल्या होत्या. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये ९३ हजार २३५ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतले आहेत. यामुळे ८८ हजार ४८ जागा चौथ्या फेरीसाठी उपलब्ध असून, २२ हजार १० जागा रिक्त आहेत. या जागा आणि चौथ्या फेरीत प्रवेश न होणाऱ्या जागा संस्थात्मक फेरीसाठी उपलब्ध होणार आहेत.
संस्थात्मक फेरी ८ सप्टेंबरपासून
चौथ्या फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता. ४) ते सोमवार(ता. ७)दरम्यान महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून प्रवेश घेता येईल. या वेळी विद्यार्थ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर करून आणि शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यानंतर संस्थात्मक फेरीचे प्रवेश ८ ते १५ सप्टेंबरदरम्यान होतील, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.