पुणे

अभियांत्रिकी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

CD

पुणे, ता. १९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या ७५१ विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची परवानगी उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयाने दिली. या विद्यार्थ्यांची परीक्षा बुधवारपासून (ता. २०) सुरू होत होती. मात्र, विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी विद्यापीठात आंदोलन केले. त्याची दखल घेत विद्यापीठाने अखेर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची परीक्षा पुढे ढकलत सुधारित वेळापत्रक जाहीर केले.
विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक प्रश्‍नांबाबत ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’ (एनएसयूआय) आणि युवक काँग्रेस यांच्यावतीने विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. त्यात सुमारे पाचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाने अभियांत्रिकी परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला. विद्यापीठाने यासंदर्भातील अधिकृत परिपत्रकही संकेतस्थळाद्वारे प्रसिद्ध केले आहे.
‘एनएसयूआय’चे भूषण रानभरे म्हणाले, ‘‘विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाची जाणीव ठेवून तातडीने निर्णय घ्यावेत.’’ यावेळी युवक काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, महेश कांबळे, ॲड. अविनाश सोळुंके, तेजस बनसोड, अदिती आघाव आदी उपस्थित होते.

‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये परीक्षा विभागाचा गलथान कारभार सातत्याने समोर येत आहे. एका खासगी प्रकाशनातील प्रश्‍न जसेच्या तसे विद्यापीठाच्या प्रश्‍नपत्रिकेत आढळणे, हे अत्यंत गंभीर असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारे आहे. ही केवळ चूक नसून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्‍वास डळमळीत करणारी बाब आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.’’
- अक्षय जैन, अध्यक्ष, माध्यम विभाग, युवक काँग्रेस

नियोजित परीक्षांच्या वेळापत्रकात बदल :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्तरावरील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांतर्गत विविध सर्व शाखांच्या नियोजित परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. परीक्षांचा सुधारित कालावधी लवकरच स्वतंत्र वेळापत्रकाद्वारे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक
परीक्षेचे नाव : सुधारित कालावधी
एस.ई. २०१९ पॅटर्न, सत्र-३ : ११ जूननंतर
टी.ई. २०१९ पॅटर्न, सत्र-५ : १७ जूननंतर
बी.ई. २०१९ पॅटर्न, सत्र-७ : १५ जूननंतर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत पुन्हा भूकंप, 3.5 रिश्टर्स स्केअर भूकंप झाल्याची भूमापक केंद्रावर नोंद

...अन् अचानक सेटवर आले रोहित शेट्टी! 'Governor' च्या शूटिंग दरम्यान चिन्मय मांडलेकरसोबत घडला रंजक प्रसंग

SCROLL FOR NEXT