बारामती, ता. १७ : पाटबंधारे खात्यातील अभियंत्यांच्या सर्व्हिस इंजिनिअर्स फोरमतर्फे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म दिन ‘अभियंता दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ अभियंता दिलीप भिसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर नंदकुमार फुले व माधव जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर अजितदादा पवार यांच्या स्मृतींना गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फोरमचे अध्यक्ष अजित जमदाडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अभियंता संपत्ती हिरवे यांचा देहदानाच्या निर्णयाबद्दल, तर राजेंद्र ठोंबरे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी दीपक पांढरे यांनी व्यक्ती ते राष्ट्र विकास, उद्धव मोरे यांनी यूपीआयचे धोके व शहाजी निंबाळकर यांनी उजनी प्रकल्पातील गाळ समस्या यावर मार्गदर्शन केले. रवींद्र पांडकर यांनी कविता सादर केली. हेमचंद्र शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त करत पालक मेळावे घेण्याचा संकल्प जाहीर केला. फुले व जोशी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
छगन लोणकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रदीप वाळुंजकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजीराव जगदाळे, प्रदीप कुलकर्णी, विनोद हिंगणे, अजित जमदाडे व हेमचंद्र शिंदे यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.