Onilne-Chat 
पुणे

नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध? जाणून घ्या त्याच संदर्भात...

सकाळवृत्तसेवा

पुणे : युवकांना रोजगार, नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, त्यांना रोजगार कशा पद्धतीने मिळू शकेल, त्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत, स्टार्टअपची सुरवात कशी करता येईल, याबाबत काही उद्योजक युवकांशी 
ऑनलाईन पद्धतीने शनिवारी (ता. 11) सायंकाळी चार वाजता संवाद साधणार आहेत. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज एँड ऍग्रीकल्चरने 'एमसीसीआयए' यासाठी पुढाकार घेतला आहे.

राज्यात 'अनलॉक' नंतर बरेच उद्योग चालू झाले आहेत. मात्र, आजही रोजगाराची परिस्थिती बिकटच आहे. महाराष्ट्र सरकारनेही 'महाजॉब्स' पोर्टल सुरू केले आहे.  
या पार्श्वभूमीवर, राज्यातील युवक-युवतींना कशा प्रकारचे रोजगार, नोकऱ्या उपलब्ध आहेत?, या नोकऱ्यांसाठी कोणती कौशल्य आवश्यक आहेत ?, त्यासाठी कशी तयारी करावी ? हे समजावून सांगण्यासाठी 'एमसीसीआयए' ने एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत पुढील काही आठवडे, दर आठवड्याला एक 'ऑनलाइन' चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रात काही सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजक हे स्वतः युवकांशी संवाद साधतील. तसेच युवकांच्या काही प्रश्नांची उत्तरेही देतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतात ६ कोटी 30 लाखांपेक्षा जास्त सूक्ष्म, लघू-मध्यम उद्योग आहेत. सुमारे ११ कोटींहून अधिक व्यक्तींना या क्षेत्राने रोजगार दिला आहे. वेब-एक्स, फेसबुक किंवा यू-ट्यूबद्वारे जास्तीत जास्त युवकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी केले आहे.  

युवकांना रोजगाराची संधी 

शनिवारी (ता. 11) - सायंकाळी चार वाजता 
वेब-एक्स shorturl.at/etAZ3
फेसबुक http://www.facebook.com/punemccia
यू ट्यूब.  www.youtube.com/punemccia

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT