MCCIA
MCCIA 
पुणे

व्हा ‘एमसीसीआयए’चे पुरस्कारार्थी! १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे उद्योजकांना आवाहन

सकाळवृत्तसेवा

पुणे - लघू, मध्यम आणि मोठ्या उद्योगांतील उद्योजकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) सात विविध क्षेत्रांतील उद्योगांना गौरविले जाते. त्यासाठी अर्ज करण्यास १५ डिसेंबरपर्यंत उद्योजकांना संधी आहे. त्याचा फायदा उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन चेंबरने केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

समाजाचे आर्थिक स्वास्थ्य टिकविण्यात उद्योगांचा मोठा वाटा आहे. तसेच, अर्थचक्राला गती देण्यातही उद्योगांची भूमिका मोलाची आहे. त्यात नावीन्यपूर्ण संकल्पना शोधून आणि त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या उद्योजकांना चेंबरतर्फे गेल्या ७० वर्षांपासून गौरविले 

जाते. त्यात टप्प्याटप्प्याने पर्यावरण, सीएसआर, महिला उद्योजकता, नवी पिढी आणि संरक्षण सिद्धता आदी क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. उद्योग क्षेत्रात ‘एमसीसीआयए’चा पुरस्कार प्रतिष्ठेचा समजला जातो. त्यासाठी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून शेकडो उद्योजक त्यांची माहिती ‘एमसीसीआयए’कडे पाठवितात. 

या पुरस्कारामुळे उद्योजकांचा आत्मविश्‍वास वाढतो. पर्यायाने त्यांच्या उद्योगवाढीस मदत होते. पुरस्कारासाठी आलेल्या अर्जांमधून विविध सात क्षेत्रांतील उद्योजकांची निवड चेंबरच्या परीक्षण समितीच्या वतीने केली जाते, अशी माहिती ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी दिली. 

चेंबरच्या या पुरस्कारांबद्दल आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दलचे अधिक तपशील www.mcciapune.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच याबाबत माहिती हवी असल्यास चेंबरचे सतीश जोशी (मोबा. क्र. ९८८११२७६५८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी करता येतील अर्ज  

  • नावीन्यपूर्ण कल्पना आणि उद्योजकता (जी. एस. पारखे ॲवॉर्डस) 
  • पर्यावरणपूरक पुढाकार (डॉ. आर. जे. राठी ट्रस्ट) 
  • न्यू प्रॉडक्‍ट्‌स अँड डिझाईन (हरी आणि मालिनी जोशी ॲवॉर्ड) 
  • सामाजिक जबाबदारीची जाणीव- सीएसआर (बी. जी. देशमुख ॲवॉर्ड) 
  • महिला उद्योजक (रमाबाई जोशी ॲवॉर्ड) 
  • नव्या पिढीचा यशस्वी उद्योजक (किरण नातू ॲवॉर्ड) 
  • संरक्षण क्षेत्रातील उत्पादन (ब्रिगेडिअर एस. बी. घोरपडे ॲवॉर्ड) 

नवे प्रॉडक्‍ट आणि डिझाइनबद्दल आमच्या उत्पादनाला मिळालेल्या पारितोषिकामुळे केवळ आमचा हुरूपच वाढला नाही, तर आम्हाला देशभरातून नवे ग्राहक मिळाले.
- चेतन नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पी. एन. सेफ्टी इंडस्ट्रीज 

पारितोषिकामुळे आमच्या संपूर्ण टीमचा हुरूप वाढला. तसेच, त्यातून बाजारपेठेसाठी आवश्‍यक असलेली उत्पादन क्षमता आमच्याकडे आहे, याचा स्पष्ट संदेशही गेला.  
- प्रीती रासकर, प्रमुख, रायका इंजिनिअरिंग सोल्यूशन्स 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT