पुणे

शुभराय मठ प्रवचन

CD

PNE26W44683
सोलापूर ः येथील शुभराय मठात प्रवचन देताना सतीश मालू.

उद्योगात यश हवे तर अपयश पचवायला शिका : सतीश मालू

उद्यमशीलतेसाठी आत्मविश्वास; जोखीम स्वीकारण्याची तयारी, अध्यात्माचे बळ आवश्यक

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २५ : उद्योगात यश मिळविण्यासाठी केवळ भांडवल किंवा संधी पुरेशी नसून, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, जोखीम स्वीकारण्याची तयारी हवी. त्यासोबतच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अपयश पचविण्याची ताकद आवश्यक आहे, असे प्रतिपादन सतीश (विष्णुदास) मालू यांनी केले. श्री शुभराय महाराज मठात ‘उद्यमशीलता’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
समाजातील समस्या ओळखून त्यावर समाजोपयोगी उपाय शोधण्याची वृत्ती म्हणजे उद्यमशीलता होय. कौटुंबिक व सामाजिक विरोध असतानाही नोकरीचा पर्याय नाकारून उद्योगाची वाट निवडणे आणि तो प्रत्यक्षात यशस्वी करून दाखवणे कौतुकास्पद आहे. नवीन संधी ओळखण्यासोबतच स्वतःसह इतरांसाठी रोजगारनिर्मितीची भावना उद्योजकात असावी. प्रामाणिकता, नीतिमूल्ये, मेहनत आणि सातत्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मालू यांनी सांगितले.
उद्योगाच्या वाटचालीत अपयश येणे स्वाभाविक आहे; मात्र त्याने खचून न जाता त्यातून पुन्हा उभे राहण्याची ताकद निर्माण करावी. यासाठी अध्यात्मिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या निष्काम कर्मयोगाच्या उपदेशाचा संदर्भ देत, कर्माच्या फळाची अपेक्षा न करता कर्तव्य केल्यास यशाने अहंकार निर्माण होत नाही आणि अपयशाने मन खचत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. उद्योगातून मिळणाऱ्या संपत्तीचा काही भाग समाजासाठी उपयोगी पडावा, अशी भावना उद्योजकांनी ठेवावी. यासाठी त्यांनी रतन टाटा व आदित्य बिर्ला यांची उदाहरणे दिली. संस्कारातून जपल्या जाणाऱ्या परंपरांमागील शास्त्रीय, व्यावहारिक व सामाजिक संदेश समजून घेतल्यास जीवनाला योग्य दिशा मिळते, असेही त्यांनी नमूद केले. पाखर संकुलचे समन्वयक व जनसंपर्क अधिकारी ध्रुव कांबळे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Daund Crime : रुग्णालयाबाहेर कुटुंबावर जीवघेणा हल्ला; ११ जणांविरुद्ध गुन्हा

IND vs SL: रिषभ पंतला नेमकं काय झालंय, विकेटकिपिंग का करत नाहीये? प्रशिक्षकांनी अखेर सत्य सांगितलं

Maharashtra Rain: पुढील ४८ तास महत्त्वाचे! 'या' जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट

Pune Adivasi Students : मांजरीत आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन तापलं; उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली

Arvind Kejriwal : 'आमची सत्ता आली तर, ई-२० पेट्रोलवर ५ दिवसांत बंदी घालणार'... केजरीवाल यांची गोव्यात मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT