sheetal1.jpeg 
पुणे

अतिदुर्मीळ कंदीलपुष्प न्याहाळण्याची पर्यावरणप्रेमींना संधी 

सकाळ वृत्तसेवा


पुणे ः बाणेरच्या तुकाईमाता टेकडीवर "कंदीलपुष्प' या दुर्मीळ प्रजातीची सुंदर फुले उमलली आहेत. ती न्याहळ्यासाठी पर्यावरणप्रेमींची पावले टेकडी परिसरात वळत आहेत. वसुंधरा अभियान संस्थेच्या माध्यमातून या परिसरात अनेक दुर्मीळ जातींचे रोपण व संवर्धन केले जात असल्याचे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले. 

वनस्पती तज्ज्ञांच्या मते कंदील पुष्पाच्या सह्याद्री भागात आढळणाऱ्या तेरा जातींपैकी ही एक अतिदुर्मीळ प्रजाती आहे. तुकाई टेकडीवर आढळणारी ही प्रजाती फक्त पावसाळ्यात येथे आढळते. ही नाजूक वेल जमिनीवर साधारण तीन-चार फूट वाढते. त्याला छान पिवळ्या रंगाची फुले येतात. फुलांचा आकार उलटा कंदील अडकवल्याप्रमाणे असतो. त्यामुळे याला "कंदीलपुष्प' असे म्हणतात. तुकाई टेकडीवर वसुंधरा अभियान संस्थेकडून 2006 पासुन झाडे लावणे व त्याचे संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. लोक सहभागातून 23,000 पेक्षा जास्त देशी, आयुर्वेदिक झाडांचे रोपण करून संवर्धन येथे केले जाते. या कामासाठी अनेक संस्था, शाळा, कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी एकत्र येतात. येथे अजून लोकसहभागाची गरज असून, जास्तीत जास्त नागरिकांनी येथे सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी 9882501501 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Annasaheb Jolle Halsiddhnath Sugar Factory: निपाणीच्या हालसिद्धनाथ साखर कारखान्याची २०२६-२७ हंगामासाठी ३७७० रुपये पहिली उचल जाहीर

Sonia Gandhi Book : "अजिबात नाही!"; भारताचे पंतप्रधानपद का नाकारले? अनेक वर्षांनंतर गांधी घराण्यातील 'त्या' निर्णयामागचे सत्य उघड!

RRC Mumbai Apprentices 2026: दहावी पास तरुणांसाठी रेल्वेत प्रशिक्षणाची मोठी संधी! २८६१ अप्रेंटिस पदांसाठी अर्ज सुरू; जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया

Latest Marathi News Live Update: राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

उद्यापासून ६ राशींचे अच्छे दिन सुरू! बुधाच्या उदयामुळे नोकरी, पैसा अन् शिक्षणात मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT