sakal news
पुणे

पती-पत्नी विभक्त असले तरी अपत्यांसाठी समान जबाबदारी; न्यायालयाचे आदेश

कौटुंबिक वादाचे प्रकरण निकाली काढताना न्यायालयाचा आदेश

सनील गाडेकर, सकाळ वृत्तसेवा

पुणे : पती-पत्नी वेगळे राहत असले किंवा त्याचा घटस्फोट झाला तरी अनेक दांपत्याचे मुलांविषयी प्रेम कायम राहते. त्यांच्यावरील प्रेमाखातर ते स्वतंत्र राहूनही मुलांची काळजी घेतात. पण, काही पालक वेगळे असतील किंवा घटस्फोट झाल्यानंतर आपल्या मुलांकडे बिलकूल लक्ष देत नसल्याचेही उदाहरणे आहेत. अशा पालकांसाठी कौटुंबिक न्यायालयाने नुकताच दिलेला एक अंतरिम निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. पती-पत्नी विभक्त होणार असले तरीही मुलांसाठी त्यांची असलेली जबाबदारी ही समानच आहे, असे आदेशात नमूद करत कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांनी मुलीचा ताबा मिळण्याच्या दाव्यात अंतरिम निकाल दिला. (Equal responsibility for offspring even if separated)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विशाल व वनिता (नावे बदललेली आहेत) यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर तीन वर्षांनी त्यांना मुलगी झाली. दरम्यानच्या काळात पती-पत्नीमध्ये वैचारिक मतभेद; तसेच संसार सुरू असताना छोट्या-मोठ्या बाबींवरून वाद झाले व ते तीन वर्ष विभक्त राहत होते. त्यामुळे वनितापासून घटस्फोट तसेच मुलीचा ताबा मिळावा यासाठी विशाल यांनी येथील कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता. दाव्यात वनिता यांच्यावतीने ॲड. अनघा काळे यांनी कामकाज पाहिले.

मुलीच्या भेटीबाबत आदेशातील मुद्दे...

  • विशाल हे दर रविवारी मुलीला भेटू शकतील

  • सणांच्या वेळी विशाल हे मुलीस त्यांच्यासोबत एक ते दोन दिवस घेऊन जाऊ शकतात

  • पती व पत्नीने मुलीच्या भेटीसंदर्भात काही बदल असल्यास एकमेकांना २४ तास आधी सांगणे बंधनकारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोरच्या दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT