पुणे

''गॅस सिलिंडर बुकिंगमधील ग्रामीण-शहरी भेदभाव संपवा''

CD

उरुळी कांचन, ता. १८ : घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगमधील शहरी आणि ग्रामीण भागातील दिवसांचा भेदभाव जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दूर करावा, अशी मागणी संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल शेलार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या गॅस सिलिंडर बुकिंगसाठी शहरी भागात २५ दिवस, तर ग्रामीण भागात ४५ दिवसांची मर्यादा आहे. अमेरिका-इराण युद्धाच्या काळात गॅस टंचाईमुळे सरकारने हा कालावधी वाढवला होता. मात्र, आता परिस्थिती सुधारलेली असतानाही ग्रामीण भागासाठी ४५ दिवसांची अट कायम ठेवण्यात आली आहे. पाच-सहा सदस्यांच्या कुटुंबाला एक सिलिंडर साधारण २५ दिवस पुरतो. अशा वेळी ग्रामीण भागातील कुटुंबांना उर्वरित २० दिवस गॅसविना राहावे लागत आहे. ग्रामीण भागातील महिला आता नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडत आहेत, त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. जिल्हा पुरवठा विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेऊन दोन्ही भागांसाठी समान कालावधी लागू करावा, असे शेलार यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! ठाकरेंच्या वकिलांनी थेट शिंदेंच्या आमदारकीवरच बोट ठेवलं, सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

Mangalagaur 2026 : नववधू मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व आणि व्रताचे लाभ

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

Nanded Sarafa Traders Security: नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार बोंढारकर आक्रमक; पोलिस अधीक्षकांसमोर त्रास, वसुलीच्या तक्रारी मांडल्या

Swami Ramanand Teerth Marathwada University Promotions: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती

SCROLL FOR NEXT