वाळुंज (ता. पुरंदर) - येथे सरदार इंगळे यांना अभिवादन करताना मान्यवर. 
पुणे

सरदार शिवाजीराव इंगळे यांचा वाळुंज येथे अश्वारूढ पुतळा उभारणार - रमेश इंगळे

दत्ता भोंगळे

गराडे - शिवाजीराव इंगळे यांचा अश्वारूढ पुतळा वाळूंज येथे उभा करुन त्या परिसराचे संपूर्ण सुशोभीकरण करुन समाजोपयोगी कामे करणार असल्याचे माजी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व सरदार शिवाजीराव इंगळे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रमेश इंगळे यांनी सांगितले.

वाळुंज (ता. पुरंदर) येथे स्वराज्याच्या पहिल्या लढायचे शिल्पकार सरदार शिवाजीराव इंगळे यांच्या ३७२ व्या शौर्य दिनानिमित्त निमित्त सासवडचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. 

सरदार शिवाजीराव इंगळे यांची वाळुंज येथे समाधी आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यादव हे होते. सरदार शिवाजीराव इंगळे प्रतिष्ठानच्या वाळूंज यांच्या वतीने पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्वराज्याची पहिली लढाई ८ ऑगस्ट १६४८ या या दिवशी खळद, वाळुंज, बेलसर या परिसरामध्ये सरदार शिवाजीराव इंगळे यांच्या नेतृत्वाखाली लढली. यामध्ये सरदार इंगळे हे धारातीर्थी पडले होते. 

या कार्यक्रमाचे संयोजन वाळुंज गावचे माजी सरपंच गोविंद इंगळे, राहुल इंगळे, महेश इगळे, मोहन इंगळे, दत्तात्रेय म्हेत्रे, विकास म्हेत्रे, बापू चौरे, ज्ञानेश इंगळे, प्रतिक इंगळे, नितीन इंगळे, अंकुश इंगळे, प्रमोद इंगळे, लक्ष्मण म्हेत्रे, अनिकेत नवले, शांताराम म्हेत्रे, विजय इंगळे, नानासो इगळे, सुनिल इंगळे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजीराव इंगळे प्रतिष्ठानचे विश्वस्त कैलास फ. इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश इंगळे यांनी केले. तर आभार प्रमोद इंगळे यांनी मानले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: रेल्वे प्रवाशांसाठी बातमी! दिवाळीपूर्वी रेल्वेचा मोठा निर्णय; पुणे-हडपसरहून अमरावती, गाझीपूर, गोरखपूरसाठी विशेष गाड्या

अर्थबोध : प्राप्तिकर विभागाला तुमचे उत्पन्न कळू शकते का?

म्युच्युअल फंड : ‘कॉन्ट्रॅरियन इन्व्हेस्टिंग’मधील संधी

Maharashtra Weather : मॉन्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुणे-सातारा-कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

करकायदा : ‘एमडीआर’वरील जीएसटी

SCROLL FOR NEXT