Pune Crime  sakal
पुणे

Pune Crime : औंधमधील गुन्हेगारी मुळासकट नष्ट करा;स्थानिक नागरिकांची भावना,पोलिस गस्त वाढविण्याची मागणी

पहाटे चालायला निघालेले ज्येष्ठ नागरिक समीर रॉयचौधरी (वय ७७) यांचा टोळक्याने केलेल्या मारहाणीत गुरुवारी मृत्यू झाला. सध्या अल्पवयीन गुन्हेगारांचा वावर वाढला असून, यावर कठोर कारवाई करावी, सर्व भागांत पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी औंधमधील रहिवाशांनी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

औंध : पहाटे चालायला निघालेले ज्येष्ठ नागरिक समीर रॉयचौधरी (वय ७७) यांचा टोळक्याने केलेल्या मारहाणीत गुरुवारी मृत्यू झाला. सध्या अल्पवयीन गुन्हेगारांचा वावर वाढला असून, यावर कठोर कारवाई करावी, सर्व भागांत पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी औंधमधील रहिवाशांनी केली आहे.

या घटनेतील एक अल्पवयीन मुलगा नुकताच बालसुधारगृहातून बाहेर आला होता. त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्य केले आहे. औंधमधील सुरक्षेविषयी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता सर्वांनीच शांत व सुरक्षित औंध पुन्हा दिसायला हवे, अशी भावना व्यक्त केली. तसेच पोलिसांनीही सतर्क राहायला हवे, असे नमूद केले.

दुचाकी, रिक्षा जप्त

या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व रिक्षा जप्त केली आहे. यातील तीन अल्पवयीन मुलांना सज्ञान असल्याचे सिद्ध करण्यासाठी बाल न्यायालयात अर्ज केला आहे. एकाला पोलिस कोठडी मिळाली असून, इतरांचा शोध सुरू आहे. सध्या गस्त वाढवली असून, नागरिकांना सुरक्षित वाटेल, याकडे लक्ष केंद्रित केले जाईल, असे चतु:शृंगी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांनी सांगितले.

औंधमध्ये यापूर्वी एवढी अस्वस्थता आणि अशांतता कधीच पाहायला मिळाली नाही. वेस्ट एंड चौकाजवळ घडलेल्या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे‌. याआधीही एका महिलेची सोनसाखळी पळविण्याची व ज्येष्ठांना अडवून पैसे मागितल्याची घटना घडली होती. अशा घटना नियमित घडत असताना पोलिसांनी परिसरात गस्त वाढवणे गरजेचे आहे. औंधमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

- सूर्यकांत कलापुरे,

अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, औंध

अशा घटना चिंताजनक असून पहाटे चालायला जायची भीती वाटत आहे. या घटना का घडतात?, याकडे वरवर न बघता पोलिस यंत्रणेने सतर्क राहून मुळापर्यंत जाऊन तपास करावा, जेणेकरून अशा प्रकारच्या गुन्हेगारीला आळा बसेल.

- राहुल गायकवाड, अध्यक्ष, औंधगाव विश्वस्त मंडळ

मी पहाटे रोज चालायला जाताना कधीच भीती वाटली नाही; परंतु सध्या रस्त्यावर चालताना भीती वाटत आहे. पहाटे तरुण मुले भरधाव वेगाने गाड्या चालवितात. यामुळे कुणाला दुखापत होईल, याची कुठलीही चिंता ते करत नाहीत.

- प्रा. डॉ. छाया लांडे, रहिवासी, औंध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

IND vs JPN, T20I: जपानने भारतीय संघाचा धूर काढला! श्रेयसचा संघ अवघ्या २ धावांनी जिंकला, फलंदाज गंडले, गोलंदाजही रडले

Marathi News Live Updates : राज्यात बहुंताश ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT