Ladki Bahin Yojana esakal
पुणे

Ladki bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या साडे तीन हजार अर्जांमध्ये त्रुटी; सुधारणेसाठी दिली संधी

लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची महापालिकेच्या केंद्रांवर गर्दी होत असून, आत्तापर्यंत १ लाख १२ हजार महिलांचे अर्ज भरून झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची महापालिकेच्या केंद्रांवर गर्दी होत असून, आत्तापर्यंत १ लाख १२ हजार महिलांचे अर्ज भरून झाले आहेत. या अर्जांची पडताळणी करताना सुमारे साडे तीन हजार अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. महिलांना अर्जातील त्रुटी दूर करण्याची एक संधी दिली असून, त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आहे.

ही दुरुस्ती त्वरित करून घ्यावी असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे. ज्या मोबाईलवरून किंवा संगणकावरून अर्ज केला आहे, त्यावरूनच अर्जात दुरुस्ती करता येईल किंवा कागदपत्रे जोडता येतील, असे समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी सांगितले.

राज्य सरकारतर्फे महिलांसाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे. यामध्ये महिलेला प्रत्येक महिन्याला १५०० रुपये बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुणे महापालिकेने योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी शहरात १९६ केंद्र सुरु केले आहेत. आजपर्यंत महापालिकेतर्फे शहरात १ लाख १२ हजार अर्जांची नोंद झालेली आहे.

महापालिकेकडे आलेल्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. आत्तापर्यंत २१ हजार अर्जांची पडताळणी झाली आहे. त्यामध्ये सुमारे साडे तीन हजार अर्ज तात्पुरते नाकारले आहेत. त्यासंदर्भात प्रत्येक महिलेच्या मोबाईल क्रमांकावर मेसेजद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

आधार कार्ड अस्पष्ट असणे, रेशन कार्डच्या मागील बाजू अपलोड न करणे, बँकेचे खाते, रहिवासी पुरावा न जोडणे किंवा अर्धवट जोडणे, हमीपत्र न जोडणे, परराज्यातील रहिवासी किंवा लग्न करून पुण्यात पंधरा वर्षापासून राहात असल्याचा पुरावा न जोडणे, रेशन कार्ड न जोडणे, उत्पन्नाचा दाखला न जोडणे या कारणांसाठी हे अर्ज तात्पुरते नाकारण्यात आले आहेत. महिलांनी या त्रुटी दूर करण्यासाठी त्यांची कागदपत्र पुन्हा अपलोड करणे आवश्‍यक आहे. ही शेवटची संधी असणार आहे.

१६ अर्ज ठरले बाद

महापालिकेने १ लाख १२ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी २१ हजार अर्जांची पडताळणी केली आहे. त्यात केवळ १६ अर्ज पूर्णपणे बाद करण्यात आली आहेत. या महिलांचे अर्ज योजनेच्या निकषांमध्ये नसल्याने त्यांचे अर्ज बाद केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

Mangalwedha News : मंगळवेढा नगरपालिकेची प्रभाग रचना झाली प्रसिद्ध; अशी असेल रचना

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

SCROLL FOR NEXT