dilip_walse_patil
dilip_walse_patil 
पुणे

राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असलाच पाहीजे - दिलीप वळसे पाटील

सुदाम बिडकर

पारगाव : आंबेगाव तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील काही दिवसांत चोरी, दरोडा, खुन, बलात्कार या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहीलेला नाही कायदा सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली आहे. भोरवाडी (अवसरी खुर्द) व लांडेवाडी या दोन्ही घटनांतील गुन्ह्यांचा त्वरीत तपास करुन गुन्हेगारांना कडक शासन झाले पाहीजे यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या घटनांची माहीती देणार असल्याची माहिती माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मंचर या ठिकाणी आज रविवारी आयोजीत पत्रकार परिषदेत श्री. वळसे पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी येथे दिड महीन्यापुर्वी पाच सहा घरांवर दरोड्याचा प्रकार घडला. या घटनेत जेष्ठ महीलेला मारहाण झाली. महीलेचा उपचार सुरु असतानाच काही दिवसांपुर्वी निधन झाले. त्या घटनेचा अद्याप तपास लागलेला नाही त्यानंतर तीन दिवसापुर्वी लांडेवाडी येथे चार-पाच घरावर दरोडा टाकण्यात आला, मारहाण करण्यात आली, महीलेवर अत्याचाराचा प्रकार घडला. या घटनांमुळे सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाच प्रकारची घटना खेड तालुक्यात व इतर तालुक्यातही घडल्या आहेत. आंबेगाव तालुक्यातील घटनांबाबत आज सकाळीच राज्याचे पोलिस महासंचालक, जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक यांच्याबरोबर दुरध्वनीवरुन बोललो आहे. 

राज्य व जिल्हा पोलिस प्रशासनाने जनतेला धीर व विश्वास देण्याच्या दुष्टीकोनातुन ज्या काही उपाय योजना करावयाच्या आहेत त्या तातडीने कराव्यात, या घटना सातत्याने घडत राहिल्यास पोलिसांचे नियंत्रण आहे की नाही याबाबत प्रश्न निर्माण होईल. सर्व सामान्यांना विश्वास देऊन या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे राज्य आहे हे सिध्द केले पाहीजे व तशा उपाय योजना केल्या पाहीजे. 

कोपर्डीच्या घटनेनंतर विद्यार्थीनीसाठी शाळेत जाण्यासाठी तेथे एस.टी. बस सुरु केली होती त्या घटनेचा निकाल आल्याबरोबर तेथील एसटी बस बंद करण्यात आल्याचे काल समजले. हा बेजाबदारपणा आहे. त्याबाबत एखादा आधिकारी चुकीचे  वागत असेल तर शासनाचे यावर लक्ष असले पाहीजे असेही श्री. वळसे पाटील म्हणाले.

तसेच भोरवाडी येथे भेट देण्यास गेलो असता स्थानिक ग्रामस्थांनी तक्रार केली की गस्तीवर येणारे पोलिस डीझेलच्या पैशाची व अन्य मागणी करतात हे चुकीचे आहे असेही श्री. वळसे पाटील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT