Escaped leopard from Katraj Zoological Museum finally trapped-srk94 seakal
पुणे

Katraj Zoological Museum: कात्रज प्राणी संग्रहालयातील पळालेला बिबट्या अखेर जेरबंद!

Katraj Zoological Museum: राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेला बिबट्या पिंजऱ्यातून पसार झाला होता. त्यानंतर सर्पोद्यानातील विलगीकरण केंद्राजवळील पाण्याच्या टाकीजवळ रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या दिसला होता.

Sandip Kapde

Katraj Zoological Museum: ४८ तासानंतर कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. हालचाली टिपणाऱ्या वेगवेगळ्या कॅमेऱ्यासह ९ पिंजरे लावण्यात आले होते. दरम्यान तो एका पिंजऱ्यात अडकला. आज (मंगळवार) रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी  बिबट्याला जेरबंद करण्यात आले. 

राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेला बिबट्या पिंजऱ्यातून पसार झाला होता. त्यानंतर सर्पोद्यानातील विलगीकरण केंद्राजवळील पाण्याच्या टाकीजवळ रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या दिसला होता. तो झाडीत असल्यामुळे त्याला डार्ट मारून त्याला बेशुद्ध करता आले नाही. (Pune Latest News)

त्यामुळे त्याला पकडण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. त्याच्या आजूबाजूला तीन पिंजरे लावण्यात आले होते. सीमा भिंत ओलांडून तो बाहेर जाऊ शकला नाही. काही वेळात त्याला त्याच्या पिंजऱ्यात परत नेण्यात यश मिळाले आहे.

बिबट्याला शोधण्यासाठी अग्निशमन दलासह विविध पथके तैनात करण्यात आली होती. हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून आणण्यात आला होता. प्राण्यांच्या अनाथालयात काही दिवसांपासून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवारी सकाळी साधारणतः साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पिंजऱ्यामध्ये बिबट्या नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांच्या मोबाईलचेही सुरु राहणार कॅमेरे; प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही, यंदा प्रथमच पर्यवेक्षकांची सरमिसळ

Morning Breakfast Recipe: प्रथिनेयुक्त नाश्ता बनवायचा असेल तर मुगापासून बनवा हा खास पदार्थ, अगदी सोपी आहे रेसिपी

Shiva Shakti Temple: भारताची एकमेव जागा जिथे शिव आणि शक्ती एकत्र दर्शन देतात, कुठे आहे हे पवित्र स्थळ पहा

INDW vs SAW, 1st T20I: जेमिमाह रोड्रिग्सचं शानदार अर्धशतक, स्मृती मानधनाचीही मिळाली साथ; भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

Accident News:'अपघातात आर्टिकामधील तिघे ठार तर दोन जखमी'; धरणगाव-धुपेश्वर रोडवरील घटना, चालकाचे नियंत्रण सुटल अन्..

SCROLL FOR NEXT