पुणे

संतांच्या विचारांमुळे जातीपातीच्या बेड्या तुटल्या

CD

पुणे, ता. १७ : ‘‘व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या संतांचे विचार अजरामर राहतात. प्रेम हीच सर्वश्रेष्ठ भावना असल्याचा संदेश संतांनी दिला. त्यामुळेच आज जातीपातीच्या बेड्या तुटू लागल्या असून, मुले-मुली आंतरजातीय विवाह करू लागली आहेत,’’ असे प्रतिपादन उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केले.
पूर्व भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कर्डिले यांना सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल संत जगनाडे महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिव महोत्सव समितीच्या वतीने नाना पेठेतील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर मंडळात हा समारंभ झाला. या वेळी वाडेकर म्हणाले, ‘‘जातिव्यवस्थेचे चटके तुकोबांसह अनेकांना सहन करावे लागले. तुकाराम महाराजांनी पीडित माणसाला केंद्रस्थानी ठेवून अभंग लिहिले. माणसाला न्याय मिळावा, ही त्यांची भूमिका होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील वंचित घटकांना तलवार आणि स्वाभिमान देऊन स्वराज्यनिर्मितीत सहभागी करून घेतले.’’ रवींद्र माळवदकर यांनी संत जगनाडे महाराज यांच्या कार्याची माहिती दिली.
याप्रसंगी भाई कात्रे, ॲड. शिवराज माळवदकर, विठ्ठल गायकवाड, ॲड. संजय कर्डिले, डॉ. मयूर कर्डिले, आकाश ताठे आदी उपस्थित होते. छाया कर्डिले यांचाही सन्मान करण्यात आला. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT