पुणे

शब्दांचेच प्रोत्साहन, धोरणात मात्र गळचेपी

CD

लोगो- ‘इथेनॉल उद्योगाची गळचेपी’

केंद्र सरकारने पर्यावरणरक्षण, परकीय चलनात बचत, अशा उद्देशांनी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्यासाठी साखर उद्योगाला प्रोत्साहन दिले. डिस्टिलरी प्रकल्प उभे करण्यासाठी भांडवल उभे करण्यासाठी मदत केली. कारखान्यांनीही इथेनॉलनिर्मितीसाठी हंगामपूर्व कर्ज घ्यावे लागत नाही, हक्काचा ग्राहक आणि खात्रीने महिन्यात पैसे मिळतात यामुळे डिस्टिलरी उभारल्या. परंतु जसा निर्यातीबाबत केंद्र सरकारच्या धरसोडपणा मुळावर आला आहे, तसाच इथेनॉलच्या धोरणांच्या धरसोडीने साखरउद्योग धास्तावला आहे. याबाबतचा आढावा घेणारी मालिका...‘इथेनॉल उद्योगाची गळचेपी’


संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. २२ : साखर उद्योगाला इथेनॉलनिर्मितीसाठी शाब्दिक प्रोत्साहन भरपूर दिले जात आहे, परंतु धोरणांच्या पातळीवर मात्र गळचेपीच सुरू आहे. धान्याधारित इथेनॉलला प्राधान्य दिले असून, साखर उद्योगातील इथेनॉलचा वाटा २८ टक्क्यांवर आला आहे. उसाच्या रसापासून आणि बी हेवी मोलासेसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची निर्मिती आणि पुरवठा मोठ्या प्रमाणात मंदावला आहे. सरकारी धोरणाचाच इथेनॉलनिर्मितीला खोडा बसल्याने साखर उद्योग चिंतेत आहे.
केंद्र सरकारने २०२३-२४ या हंगामात साखरेच्या किंमतीना अटकाव घालण्यासाठी ज्यूस व बी हेवी मोलासेसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर बंधने घालत पहिला धक्का दिला होता. आता चालू हंगामात देशातील साखरउद्योग व अन्य इथेनॉल प्रकल्पांनी १७७६ कोटी लिटर इथेनॉलचे प्रस्ताव दिले होते, त्यापैकी केवळ १०४८ कोटी लिटरच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. एकट्या महाराष्ट्रातील साखर उद्योगाने २६६ कोटी लिटरच्या निविदा भरल्या, मात्र केवळ ११६ कोटी लिटर कोटा मंजूर झाला. कोटा देताना सी हेवी मोलासेसपासून इथेनॉलनिर्मिती करणाऱ्यांना पुरेसा कोटा दिला. मात्र, रसापासून व बी हेवी मोलासेसपासून इथेनॉलनिर्मिती करणाऱ्यांना अत्यंत कमी कोटा दिला. त्यामुळे चालू हंगामात कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या डिस्टिलरींची चाके मंदावली. काही कारखान्यांना साठ ते ऐंशी टक्के, तर काही कारखान्यांना चक्क तीस ते चाळीस टक्के कोटा देण्यात आला आहे. यामुळे यंत्रसामग्री पडून राहून व्याजाचा भुर्दंड वाढला आहे. काही कारखान्यांवर पुरेसा कोटा मिळालेल्या कारखान्यांना इथेनॉल देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.


पहिल्या सायकलमध्ये साखर कारखान्यांना कमी कोटा मिळाला होता. दुसऱ्या सायकलमध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केलेल्या मागणीनुसार साठ कोटी लिटर इथेनॉलनिर्मितीची परवानगी द्यावी. ज्यांनी मोलासेसचा साठा करून ठेवला आहे त्यांना लाभ होऊ शकेल.
- राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक, सोमेश्वर साखर कारखाना

उसाची गोडी घटली,
मकेची हनुमानउडी
पाच वर्षांपूर्वी साखरउद्योग नव्वद टक्के इथेनॉलपुरवठा करत होता. तो वाटा आता २८-३० टक्क्यांवर आला असून, मका नंबर वन बनला आहे. शेतकऱ्यांच्या मालकीच्या साखर उद्योगाला अधिक संधी आवश्यक आहे.

उद्योगनिहाय इथेनॉलपुरवठा पुढीलप्रमाणे
साखर उद्योग- २८९ कोटी लिटर
धान्य- ४८ कोटी लिटर
तांदूळ- २३३ कोटी लिटर
मका- ४७९ कोटी लिटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

SCROLL FOR NEXT