इथेनॉलच्या किमतीत
वाढ करून दर स्थिर ठेवा
मानसिंगराव नाईक : बॉयलर अग्निप्रदीपन
शिराळा, जि. सांगली : केंद्र सरकारने अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला सावरण्यासाठी साखरेबरोबरच इथेनॉलच्या किमतीत वाढ करून दर स्थिर ठेवावेत, अशी मागणी ‘विश्वास’चे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केली.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक कारखान्याच्या गळीत हंगाम २०२६-२७ साठीच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभप्रसंगी ते बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजय देशमुख, कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
नाईक म्हणाले, की साखर कारखानदारी अडचणीतून जात आहे. त्याला केंद्र सरकारचे अनिश्चित धोरण जबाबदार आहे. गेल्या काही दिवसांत साखरेच्या किमतीत अचानक झालेली वाढ व घसरण यामुळेही साखर उद्योगापुढील अडचणी वाढल्या आहेत. साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर आणण्यासाठी साखरेबरोबरच इथेनॉलच्या किमतीत वाढ करून दर स्थिर ठेवणे गरजेचे आहे.
गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात कारखान्यास अडचणी आल्या. आर्थिक शिस्त बिघडू न देता अडचणींवर मात केली. यावर्षी तोडणी-वाहतूक यंत्रणा पूर्ण क्षमतेने भरली आहे. गाळपाचे नेटके नियोजन केले आहे. पुढील वर्षी गाळप क्षमता वाढविण्यात येणार आहे. संचालक मंडळ, सभासद, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठबळावर हंगाम यशस्वी करणार आहे.
दरम्यान, प्रारंभी कोंडिबा चौगुले व संचालक अनिता चौगुले यांच्या हस्ते विधिवत होम व पूजा संपन्न झाली. अध्यक्ष मानसिंगराव नाईक व सुनीता नाईक यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. संचालक शिवाजी पाटील यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी प्रास्ताविक केले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.