पुणे

साखरेपासून इथेनॉल निर्मिती बंदीचा केंद्राचा आदेश जारी

CD

साखरेपासून इथेनॉल निर्मिती
बंदीचा केंद्राचा आदेश जारी

एक नोव्हेंबरपासून आदेशाची अंमलबजावणी

ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : आगामी इथेनॉल पुरवठा वर्ष २०२६-२७ मध्ये उसाचा रस (शुगरकेन ज्यूस) आणि बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास साखर कारखाने आणि डिस्टिलरींना परवानगी दिली जाणार नसल्याचा आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न व वितरण विभागाने गुरुवारी (ता. २२) काढला आहे.
या निर्णयामुळे इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसिस वापरणाऱ्या साखर उद्योगासमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार, १ नोव्हेंबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२७ या इथेनॉल पुरवठा वर्षात उसाच्या रसापासून तसेच बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल तयार करण्यास मनाई असेल. या निर्णयाची राज्यांमध्ये काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित राज्यांच्या उत्पादन शुल्क विभागांना आवश्यक निर्देश देण्याची सूचना केंद्राने केली आहे.
केंद्र सरकारने सर्व साखर उत्पादक राज्यांच्या प्रधान सचिव आणि सचिवांना या निर्णयाची माहिती देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबंधित साखर कारखाने व डिस्टिलरींच्या कामकाजावर लक्ष ठेवावे आणि प्रतिबंधित कच्च्या मालापासून इथेनॉल निर्मिती होणार नाही, याची खात्री करावी, असे आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''माझ्याकडेही एक क्लिप आहे.. पिंपरी चिंचवड...'', अजय बारस्कर यांच्याकडून जरांगे पाटलांच्या चारित्र्यावर संशय

Naming Controversy: ट्रम्प यांची सटकली! आता म्हणताहेत 'अटलांटिक महासागरालाच माझे नाव द्या!'

ABHISHEK SHARMA : पहिल्याच बॉलवर सिक्स मारताच अभिषेक शर्माच्या नावावर मोठा विक्रम; शफिकुल्लाहचा रेकॉर्ड मोडला, सूर्या कितव्या नंबरवर?

'माझ्यावर होणाऱ्या मीम्सवर मीही हसतो'; सचिन पिळगांवकर ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...'ही माझी पोरं'

Latest Marathi News Live Update : पुढची ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागणार नाही...! अमित शाह यांचा राहुल गांधीवर निशाणा

SCROLL FOR NEXT