पुणे

नगर- साखर कारखान्यांना इथेनाॅल निर्मिती करायला सांगितले, आता घेत नसल्याने शेतकऱ्यांना फटका ः माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा आरोप

CD

पान १६

इथेनॉल खरेदी थांबविल्याने
शेतकऱ्यांना फटका

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा आरोप

अॅग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः केंद्र सरकारने सहकारी साखर कारखान्यांना इथेनॉल तयार करण्यास सांगितले. मात्र आता सरकारच इथेनॉल खरेदी करत नसल्याने कारखान्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. इथेनॉलची खरेदी करण्याची जबाबदारी सरकारची आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने देशातील साखर निर्यात केली आणि आता १० लाख टन साखर आयात केली आहे. सरकारच्या निर्णयांमध्येच गोंधळ असल्याचा आरोप करीत, या धोरणांचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना बसत असल्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
खांडगाव (ता. संगमनेर) येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊस शेती विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी ऊस विकास मेळावा झाला. या वेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, ॲड. माधवराव कानवडे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, संपतराव डोंगरे, लहानुभाऊ गुंजाळ, इंद्रजित थोरात, रामहरी कातोरे, रामदास वाघ, वसंतदादा शुगरचे शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते, शेतकरी व ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोरात म्हणाले, ‘‘ऊस व दूध हे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणारे व्यवसाय आहेत. थोरात कारखान्याने कायम चांगला भाव दिला असून, कार्यक्षेत्रात ऊस क्षेत्रवाढीबरोबरच एकरी उत्पादनही वाढले पाहिजे. नवीन एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांवरील समस्या आणि त्यावरील उपाययोजना लवकर करणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी काम करावे.’’
कोणत्याही शेतकऱ्याला ऊस लागवड करायची असल्यास, त्यांनी तीन महिने अगोदर कारखान्याला कळविल्यानंतर त्या शेताचे आरोग्य कार्ड तयार केले जाते. याचबरोबर उसाची उत्पादकता व क्षेत्र वाढल्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गाळपही वाढणार आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी होणार आहे. नवीन एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकांवरील समस्या आणि त्यावरील उपाययोजनांची तातडीने माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रभावी उपाययोजना लवकर करणे शक्य होत आहे.

पंचवीस शेतकऱ्यांच्या शेतात प्रयोग
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ऊस विकासाला चालना देण्यासाठी २५ शेतकऱ्यांच्या शेतांवर प्रयोग राबविण्यात आला आहे. दररोज हवामानातील बदल, संभाव्य कीड, पाण्याची उपलब्धता याबाबतची माहिती शेतकऱ्यांना मिळत असून, या २५ शेतकऱ्यांचा स्वतंत्र प्रयोगतत्त्वावर गट तयार करण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी परवडणारी शेती करू शकतील, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahi Handi Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात देवेंद्र फडणवीसांनी फोडली दहीहंडी; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Mumbai Dahihandi: मुंबईत थरांचा थरार! दहीहंडी उत्सवात २२ गोविंदा जखमी

Mhada: गिरणी कामगारांना दिलासा! 'म्हाडा'च्या घरांचे सेवाशुल्क माफ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: दिल्लीत मुसळधार पावसामुळे विमानतळ उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी

दहीहंडीच्या मंचावर सेलिब्रिटींची चांदी! काही मिनिटांच्या हजेरीसाठी किती पैसे घेतात कलाकार? अनेकांचा वर्षाचा पगारही पडेल कमी

SCROLL FOR NEXT