पुणे

अक्कलकोट तालुक्यात युरोपियन नीलकंठाचे दर्शन वाढले; स्थलांतराबाबत उत्सुकता हवामान, खाद्याची उपलब्धता आणि अनुकूल अधिवासाचा प्रभाव; पक्षीनिरीक्षकांमध्ये उत्सुकता

CD

JEU26B08531
युरोपियन नीलकंठ
---
सातासमुद्रापारचा पाहुणा अक्कलकोटच्या शिवारात!
तालुक्यात युरोपियन नीलकंठाचे वाढले दर्शन; पक्षी निरीक्षकांमध्ये उत्सुकता
राजशेखर चौधरी
अक्कलकोट, ता. २७ : तालुक्यात यंदा देखण्या युरोपियन नीलकंठ (युरोपियन रोलर) या स्थलांतरित पक्ष्याच्या दर्शनाच्या नोंदी वाढल्या आहेत. शिरवळ, कर्जाळ आणि गळोरगी तलाव परिसरासह तालुक्यातील अन्य भागांतही हा पक्षी आढळून येत असल्याने पक्षीप्रेमी आणि निरीक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या वाढत्या नोंदींमागे स्थलांतराच्या मार्गातील संभाव्य बदल की अनुकूल पर्यावरणीय परिस्थिती, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
निळसर-हिरवट पिसारा, तपकिरी पाठ आणि उडताना चमकणारे निळे पंख ही या पक्ष्याची वैशिष्ट्ये आहेत. युरोप आणि मध्य आशियातील प्रदेशांत प्रजनन करणारा हा पक्षी हिवाळ्यात आफ्रिकेकडे स्थलांतर करतो. या प्रवासात भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थितीनुसार त्याच्या मार्गात बदल होऊ शकतात.
यंदा महाराष्ट्रात या पक्ष्याच्या वाढलेल्या दर्शनामागे वाऱ्यांची दिशा, तापमान, पावसाची स्थिती तसेच खाद्य आणि विश्रांतीसाठी उपलब्ध अनुकूल ठिकाणे ही कारणे असण्याची शक्यता आहे. मोकळी शेती, गवताळ प्रदेश आणि कीटकांची मुबलकता असलेले भाग या पक्ष्यांसाठी पोषक ठरतात. मात्र, वाढत्या नोंदींमागील नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी वैज्ञानिक अभ्यासाची आवश्यकता आहे.
युरोपियन नीलकंठ प्रामुख्याने टोळ, भुंगे आणि मोठे कीटक खात असल्याने कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्याच्या स्थलांतराच्या नोंदी पर्यावरणातील बदलांचा अभ्यास करण्यासाठीही उपयुक्त ठरतात. भारतीय नीलकंठ आणि युरोपियन नीलकंठ हे वेगवेगळे पक्षी असल्याने त्यांची अचूक ओळख करून नोंदी करणे आवश्यक आहे. तसेच नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन आणि कीटकनाशकांचा अनावश्यक वापर टाळण्याची गरज पक्षी अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
---
कोट
यंदा अक्कलकोट-सोलापूर परिसरासह महाराष्ट्रात युरोपियन रोलर (नीलपंख) पक्ष्यांचे वाढलेले दर्शन निसर्गप्रेमींसाठी आनंददायी आहे. या सुंदर स्थलांतरित पक्ष्यांचे संवर्धन आणि वैज्ञानिक निरीक्षण करणे ही काळाची गरज आहे.
- समीर मनियार, पक्षीनिरीक्षक, अक्कलकोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT