Online-Admission
Online-Admission 
पुणे

या गावांमध्येही अकरावीचे प्रवेश ’ऑनलाईन’च

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये शासन मान्यता प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे, अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी दिली आहे.

महापालिकेच्या क्षेत्रातील कळस, धानोरी, लोहगांव (उत्तर), लोहगांव (पूर्व), मुंढवा (केशवनगर पूर्व), हडपसर (साडेसतरानळी), फुरसुंगी, उरुळी देवाची दक्षिण पूर्व (हडपसर), महंम्मदवाडी, उंड्री, येवलेवाडी, कात्रज, धायरी,  वडगांव बुद्रुक, आंबेगांव बुद्रुक, आंबेगांव खुर्द, शिवणे, बावधन खुर्द, वडगांव खुर्द, बाणेर, बालेवाडी या नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील सर्व मान्यता प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने https://pune.11thadmission.org.in  या संकेतस्थळावरुन होणार आहेत. या गावातील कनिष्ठ महाविद्यालयाची नोंदणी ’’https://pune.११thadmission.org.in’ या संकेतस्थळावर करावी. तसेच महाविद्यालयाचे लॉगिन करण्यासाठी त्वरित 11thonline admissiondydpune@gmail.com’ या ईमेल आयडीवर प्रस्ताव पाठवावा. यासाठी १५ जुलैपर्यतची मुदतवाढ असल्याने प्रथम प्राधान्याने कार्यवाही करावी. याबाबतचे निवेदन www.dydepune.com’ आणि ’https://pune.11thadmission.org.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही शेंडकर यांनी प्रसिद्ध निवेदनात म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑफलाइन प्रवेश नकोत
‘कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने अकरावीचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने करू नयेत. अन्यथा त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेवर आणि प्राचार्यांवर राहील,‘ असे अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT