Akashvani Pune sakal
पुणे

Akashvani Pune : आकाशवाणी पुणे केंद्राचे एप्रिलपासून सायं प्रसारण

आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे सायंकाळचे स्थानिक प्रसारण आता एप्रिल महिन्यापासून पूर्ववत होईल. गेली दोन वर्षे ते बंद होते. हे प्रसारण पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी पुण्यातील श्रोते अनेक महिन्यांपासून करीत होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे सायंकाळचे स्थानिक प्रसारण आता एप्रिल महिन्यापासून पूर्ववत होईल. गेली दोन वर्षे ते बंद होते. हे प्रसारण पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी पुण्यातील श्रोते अनेक महिन्यांपासून करीत होते. त्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच परवानगी दिली.

आकाशवाणीचे पुणे केंद्र १९५३ पासून कार्यरत आहे. प्रसार भारतीच्या आकडेवारीनुसार आकाशवाणीचे सर्वाधिक श्रोते असलेले शहर पुणे आहे. तसेच पुणे हे जाहिरातींच्या माध्यमातून सर्वाधिक उत्पन्न मिळवणारे केंद्रही आहे. यानंतरही दोन वर्षांपूर्वी प्रसार भारतीच्या धोरणात्मक निर्णयामुळे आकाशवाणीच्या पुण्यासह महाराष्ट्रातील सर्वच केंद्रांची सायंकाळची प्रसारण निर्मिती बंद करण्यात आली. त्याऐवजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करण्याचे आदेश देण्यात आले.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रातर्फे सायंकाळचे स्थानिक प्रसारण सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला होता. त्यास परवानगी मिळाली असून एप्रिलपासून सायंकाळचे स्थानिक प्रसारण आम्ही सुरू करणार आहोत.

- इंद्रजित बागल, केंद्र संचालक आकाशवाणी व दूरदर्शन, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur's New CM : युमनाम खेमचंद सिंह असणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री!, विधिमंडळ पक्षनेतेपदी झाली निवड

Horoscope News : 'या' राशींच्या अडचणीचा काळ झाला सुरु ! अंगारक योगामुळे करावा लागणार संकटांचा सामना

Latest Marathi News Live Update : लोणावळ्यातील तरुणीचा मृत्यू हा अपघात नसून आत्महत्या; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

माझ्याच मित्रांनी माझ्या मागे कारस्थान केलं... सागर कारंडेने सांगितलं इंडस्ट्रीचं खरं रूप; म्हणाला, 'तुमचा वापर टिशु पेपरसारखा...'

Baramati News : बारामती दूध संघ व माळेगाव नगरपंचायत प्रशासकीय इमारतीचे नामांतर

SCROLL FOR NEXT