पुणे

पुण्यात रोज एकवेळ पाच तास पाणी

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणेकरांना समान पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यामुळे सर्व भागांना दररोज एकवेळ सलग पाच तास पाणीपुरवठा करण्यात येईल. याची अंमलबजावणी सोमवार(ता. २९)पासून होईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी जाहीर केले. 

वितरण व्यवस्थेतील दोष दूर करून ज्या भागांत सात तासांपेक्षा अधिक पाणीपुरवठा होता, तो कमी होणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत पुणेकरांना काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागेल. पावसाने ओढ दिल्याने शहराच्या पाणीसाठ्यात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीने घेतला आहे. त्यातच बहुतांशी भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून पुणेकरांचे हाल होत आहेत. पाणीसाठ्यात कपात होणार असल्याने दिवाळीनंतर दररोज दोनऐवजी एकवेळ पाणीपुरवठा करण्याची घोषणा महापालिका प्रशासनाने सोमवारी केली. या पार्श्‍वभूमीवर महापौरांसमवेत झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत धोरण आखण्यात आले. टिळक म्हणाल्या, ‘‘पाणी कपातीची वेळ आली तरी पाणी कमी पडू देणार नाही. काही भागात सात-आठ तास पाणीपुरवठा होता. काही भागातील नागरिकांना चार तासही पाणी मिळत नाही. त्यामुळे पुरेशा दाबाने पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे.’’

महापालिका आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘‘वितरण व्यवस्थेत दोष असल्याने पाण्याची गळती होते. परिणामी नागरिकांना पाणी कमी पडते. त्यामुळे गळती रोखण्याच्या उपाययोजना करून धरणातून घेण्यात येणाऱ्या पाण्याचा पूर्ण वापर करता येणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL २०२६ शेड्यूल कधी जाहीर होणार? तारीख आली समोर; BCCI सचिवांनी मोठा ट्विस्टही सांगितला!

Mutual Fund: फेब्रुवारीत गुंतवणूकदारांचा बदलला मूड! कोणत्या फंडांमध्ये वाढली गुंतवणूक? गोल्ड ETF गुंतवणुकीत मोठा बदल

Kannad News : कन्नडमध्ये अखेर युतीचं सुत जुळलं; सुप्रिया घुगे सभापती तर माया सुराशे उपसभापती

Horoscope : मिथुन राशीत गुरु मार्गी गोचर; 11 मार्चपासून धनुसह 'या' 5 राशींसाठी शुभलाभ संयोग, धनलाभ, कामात यश अन् जीवनात मोठा बदल

मोठी बातमी : T20 World Cup विजेत्या भारतीय खेळाडूवर आयसीसीची दंडात्मक कारवाई! 'ती' चूक महागात पडली

SCROLL FOR NEXT