every Sunday Swargate-Raigad list pune Shivjayanti 2021 
पुणे

शिवजयंतीनिमित्त खास एसटी; स्वारगेट ते रायगड दर रविवारी बससेवा

सकाळवृत्तसेवा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त (ता. १९) आणि त्या पुढे दर रविवारी एसटी महामंडळातर्फे अवघ्या ६१० रुपयांत रायगड दर्शन फेरीसाठी स्वारगेट आगारातून निमआराम बस प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.

शिवजयंती सोहळ्याची अनुभूती घेण्यासाठी १९ फेब्रुवारी रोजी या बसची खास फेरी आयोजित करण्यात आली आहे. रायगड दर्शनाची बस पायथ्यापर्यंत पोचेल. ही बस १९ फेब्रुवारी आणि दर रविवारी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी स्वारगेट आगारातून सुटेल. रायगड दर्शन झाल्यावर संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही बस पुण्यात येईल.

हेही वाचा - Fastag Update: फास्टॅगचा पहिला दिवस; खेड-शिवापूर टोल नाक्यावर काय परिस्थिती?

या बसचे आरक्षण www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. तसेच एसटी महामंडळाच्या शहरातील आरक्षण केंद्रांवरही या बसचे आरक्षण प्रवाशांना मिळेल, अशी माहिती एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रण रमाकांत गायकवाड यांनी दिली.

लाल महालात शिवमहोत्सवाला प्रारंभ
छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने लाल महालामध्ये 13 ते 19 फेब्रुवारीदरम्यान शिवमहोत्सव- 2021 चे आयोजन करण्यात आले आहे. या शिवमहोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (ता.13) अतिरिक्त जिल्हाधिकारी देशमुख आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते झाले.

हेही वाचा - पेट्रोलच्या शतकाला पाच रुपयांची कमी ; पुण्यात डिझेल ८४.६८ रुपये लिटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhante Surei Sasai Viral Video : भंते ससाई यांनी महिलेवर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल; विविध संघटना आक्रमक, अध्यक्षपदावरून हकालपट्टीची मागणी

Kolhapur crime News Today : घरातील पैशांच्या वादातून मुलाकडून वडिलांचा खून; कोल्हापुरातील शाहूवाडीमध्ये खळबळ

Maha Shivratri 2026: भोलेनाथाच्या दरबारात समान हक्क! महाशिवरात्री 2026 ला त्र्यंबकेश्वरमध्ये VIP दर्शन बंद, जाणून घ्या काय झाले बदल

IND vs PAK : पाकड्यांनी लायकी दाखवली! इंग्लिश फॅन्सला धक्काबुक्की, धमकी अन्... पाकिस्तानी मार खाणारच होता, पण... Video

Vagdari ZP Election : बालेकिल्ल्यात भाजपचा धक्कादायक पराभव! बंडखोरी, अंतर्गत मतभेदांचा फटका; धनुष्यबाणाने केली कमळावर मात

SCROLL FOR NEXT