Sachin Ahir Sakal
पुणे

पुणे मनपावर भगवा फडकविण्याची सर्वांचीच जबाबदारी - सचिन आहेर

प्रमोद भानगिरे यांच्या कामाचा धडाका पाहून पालिकेमध्ये महत्त्वाचे पद व जबाबदारी देणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

प्रमोद भानगिरे यांच्या कामाचा धडाका पाहून पालिकेमध्ये महत्त्वाचे पद व जबाबदारी देणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिली.

उंड्री - पुणे महापालिकेवर (Pune Municipal) भगवा (Bhagava) फडकविण्याची तुमची-माझी सर्वांचीच जबाबदारी (Responsibility) आहे. प्रमोद भानगिरे (Pramod Bhangire) यांच्या कामाचा (Work) धडाका पाहून पालिकेमध्ये महत्त्वाचे पद व जबाबदारी देणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी दिली.

नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी स्वखर्चातून उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक व धर्मवीर आनंद दिघे वाचनालयाचे लोकार्पण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिन अहिर यांनी वाचनालयात बसून वृत्तपत्र वाचण्याचा आनंद घेतला. याप्रसंगी शहर शिवसेना अध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक विशाल धनवडे, विजय देशमुख, राजू भाडळे, गणेश शिंदे, सरपंच प्रज्ञा झांबरे, बाळासाहेब भानगिरे, तानाजी लोणकर, राजेंद्र बाबर उपस्थित होते. यावेळी भाजपा महिला पदाधिकारी अयोध्या बबन आंधळे यांनी शेकडो महिला आणि इतर पक्षातील महिलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत असलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला. तसेच, भाग्यवान महिलेला अकरा हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

भानगिरे म्हणाले की, पालिकेमध्ये नव्याने समाविष्ट गावातील विकासकामांचा आढावा घेतला. पुणे महानगरपालिकेवर भगवा फडकावणारच. हडपसर विधानसभा मतदारसंघात दहापेक्षा अधिक शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न आहे. शिवसेनेचे जीवावर मोठे झालेल्यांना आता शिवसेना पक्षाचा विसर पडला आहे, असा घणाघातही विरोधकांना लगावला.

सचिन नाना तरवडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल यांची शतकी खेळी! विक्रमांचा पाडला पाऊस, २००७ नंतर घडला मोठा पराक्रम

Crime News: लग्नाच्या पहिल्या रात्री खोलीत लावला छुपा कॅमेरा, पत्नीसोबतच्या खाजगी क्षणाचे व्हिडिओ दुबईतील मित्रांना पाठवले अन्...

KBC 17 मध्ये विचारला रामायणाबद्दल सोपा प्रश्न, स्पर्धक विचारच करत राहिली; तुम्ही लगेच उत्तर देऊ शकाल का?

Latest Marathi News Live Update: गरोदर महिलेचा खून करून फेकले रस्त्याचा कडेला, दुर्गंधी सुटल्याने घटना आली समोर..

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलने शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशन मागचं कारण काय? स्टोरी ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान Video Viral

SCROLL FOR NEXT