Dr. Narendra Dabholkar sakal
पुणे

Dr. Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोलकर प्रकरणी आरोपीविरुद्ध पुरावे सिद्ध, जास्तीत जास्त शिक्षा द्यावी; कुटुंबीयांची न्यायालयाकडे मागणी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याप्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या विरोधात पुरावे सिद्ध झालेले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याप्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या विरोधात पुरावे सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी डॉ. दाभोलकर यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयाकडे केली आहे.

याबाबतचे लेखी म्हणणे दाभोलकर कुटुंबीयांच्यावतीने ॲड. ओंकार नेवगी यांनी गुरुवारी (ता. २२) विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सादर केले.

डॉ. दाभोलकर यांचा खून करण्यामागचा उद्देश काय होता? डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्या आरोपींना दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी छायाचित्रासह न्यायालयात ओळखले आहे. तसेच डॉ. दाभोलकर यांचे शवविच्छेदन करणारे ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी सर्व माहिती न्यायालयात सांगितली आहे.

आरोपी अंदुरे याने गुन्हा केल्याचा कबुली जबाब अतिरिक्त न्यायालयात दिला आहे. या सर्वांच्या आधारे आरोपींविरुद्ध अनेक पुरावे सिद्ध झाले आहेत, असे या अर्जात नमूद आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) वकिलांचा अंतिम युक्तिवाद संपल्यानंतर डॉ. दाभोलकर कुटुंबीयांच्यावतीने न्यायालयात लेखी म्हणणे सादर करण्यात आले.

आरोपींचे मानसिक विश्लेषण विचारात घ्यावे -

मानसशास्त्रीय मूल्यांकन करण्याच्या पुराव्याला देखील मूल्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने २०२३ साली दिलेल्या एका निकालात नमूद आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींचे मानसशास्त्रीय मूल्यांकन विचारात घेतले पाहिजे, अशी मागणी देखील अर्जात करण्यात आली आहे. एका मार्चला बचाव पक्षाच्यावतीने अंतिम युक्तिवाद सुरु होणार आहे. त्यापूर्वी आम्ही दोन महत्त्वपूर्ण न्यायनिवाड्याचे दाखले देणार आहोत, असेही ॲड. नेवगी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT